त्यापेक्षा त्यांना घरीच बसायला सांगाना!
सवंग लोकप्रियतेसाठी सरकार काय काय करील याचा नेम नाही.पण त्यात देशाचे नुकसान होते त्याचे काय? सरकार न्यू लेबर कोड नावाचे एक विधेयक आणणार आहे . त्यात सरकारी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून फक्त चारच दिवस काम करायचे आहे उर्वरित तीन दिवस त्यांना सुट्टी मिळणार आहे.देशातील सर्व शासकीय यंत्रणा आणि औद्योगिक क्षेत्र जर एक दिवस बंद राहिले तर अब्जावधी रुपयांचे नुकसान होते सरकारचा कोट्यवधीचा महसुल बुडतो अशावेळी जर आठवड्यातून 3 दिवस सरकारी सुट्टी असेल तर देशाचे किती आर्थिक नुकसान होईल याची कल्पनाही करवत नाही . एकीकडे देशाच्या एकूण महसुली उत्पणापैकी जवळपास 35 ते 40 टक्के महसुल हा सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन वर खर्च होतो . असे असताना त्यांना कामाच्या बाबतीतही आणखी सवलती कशासाठी? पंतप्रधान मोदी देशाला म्हणे आर्थिक महासत्ता बनणार आहेत . देशातील लोकांना अशा सुट्ट्या देऊन देशाचे उत्पादन बुडवून ते देशाला कसे काय आर्थिक महासत्ता बनणार आहेत तेच कळत नाही.अगोदरच सनवार, महापुरुषांच्या जयंत्या आणि पुण्यतिथी यांच्या सुट्ट्या दिल्या जात आहे .त्यात आणखी आठवड्यात एका सुट्टीची भर घालण्यापेक्षा या लोकांना घरातूनच काम करायला सांगाना . कार्यालयात येण्याचा त्रास तरी कशाला घेताय? बरे हे सरकारी कर्मचारी अस कोणत मेहनतीचं काम करतायत की ज्यामुळे त्यांच्यावर मोठा कामाचा ताण पडतोय? 10 ची दुटी असेल तर 12 वाजता कामावर हजार होतात आणि 5 वाजयच्या आत सटक्तात .तरीही त्यांना कामाचा त्रास होतोय.मग जे बिचारे अंग मेहनतीचे काम करतात त्यांचे काय ? त्यांना फक्त आठवड्यातून एकच सुट्टी आणि सरकारी कर्याल्यातल्या कमचोरणा आठवड्यातून तीन तीन सुट्ट्या हा कुठला न्याय?
सध्या बायोमेट्रिक हजेरीमुळे सरकारी कर्मचारी वेळेवर तरी कामाला येतायत नायतर पूर्वी कित्येक कर्मचारी असे होते की कामावर न जाताही त्यांची हजेरी लागत असे आणि ते दुसरीकडे काम करून एकाच वेळी दोन ठिकाणचा पगार घ्यायचे.मिळालेल्या माहितीनुसार असे कितीतरी लोक आजही आहेत जे आपल्या वरिष्ठांना महिन्याला एक ठराविक रक्कम देऊन आपली हजेरी लावून घेतात पालिकेच्या बी वार्ड मध्ये काही वर्षांपूर्वी आरोग्य विभागात एक असा कर्मचारी होता जो 12 वाजता कामाला जायचं आणि 4 वाजता घरी यायचा .त्याच्या या दुटीचे त्याच्या मित्रांना आश्चर्य वाटायचे पण एकदा तो मित्रांसोबत प्यायला बसला असता त्याने दारूच्या नशेत जो खुलासा केला तो भयानक होता .पालिकेच्या आरोग्य विभागासाठी जी औषधे येतात ती खाजगी दवाखान्यात किंवा मेडिकल स्टार्सना गुपचूप दिली जातात आणि त्याच्या वसुलीसाठी त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची नेमणूक केली होती . त्यामुळे तो वसुलीसाठी 12 वाजता जायचा आणि 4 वाजता यायचा असे भयंकर प्रकार सरकारी कार्यालयांमध्ये चालतात आणि तरीही जर सरकार त्यांच्यावर सवलतींचा पाऊस पडणार असेल तर सरकारला जाब विचारायचा वेळ आली आहे . तसेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या आठवड्यातून तीन दिवसांच्या सुट्टीला सर्वांनी विरोध करायला हवा .