ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

५ वर्षात बारा हजार कोटींची रस्त्याची कामे- पालिका प्रशासनाची चौकशी करा- मिलिंद देवरा यांची मागणी

मुंबई/ घर फिरले की घराचे वासे सुधा फिरतात अशीच काहीशी अवस्था झाली आहे शिवसेनेची! कारण एकीकडे सरकार कोसळले आहे आणि उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री पद गेले तर दुसरीकडे आघाडीतील काँग्रेस पक्षानेच पालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे .
काँग्रेसचे माजी खासदार मिळून देवरा यांनी पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर रस्ते घोटाळ्याचा आरोप केला आहे गेल्या 5 वर्षात रस्त्यांच्या कामावर पालिकेने 12 हजार कोटी खर्च केले तरीही रस्त्यावर खड्डे पडले आणि हे खड्डे बुजविण्यासाठी आणखी225 कोटी खर्च केले त्यामुळे रस्त्याच्या कामात झालेला हा फार मोठा घोटाळा असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे असे मिलिंद देवता यांनी म्हटले आहे मात्र देवरा यांच्या या आरोपामुळे पुन्हा एकदा आघाडीत बिघडी होण्याची शक्यता आहे .

error: Content is protected !!