ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

मुंबई महापालिकेवर सत्ताधारी भाजपा- शिंदे गटाचा हल्लाबोल-मुंबई महापालिकेत आयुक्तांची विरप्पण गँग

मुंबई / काल विधानसभेत सत्ताधारी भाजपा शिंदे गटाच्या आमदारांनी मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढताना मुंबई महापालिकेत पालिका आयुक्त चहल यांची विरप्पन गँग सक्रिय असल्याचा आरोप केला आहे.तसेच गेल्या 25 वर्षात महापालिकेत 3 लाख कोटींचा भ्रष्टाचार झाला असून या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
काल विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा झाली या चर्चेत भाग घेताना भाजप आमदार अमित साटम हे चांगलेच आक्रमक झाले होते त्यांनी सांगितले की मुंबई महापालिकेत गेल्या 25 वर्षात तीन लाख कोटींचा घोटाळा झाला आहे.आणि हा घोटाळा देशातील सर्वात मोठा घोटाळा असल्याने त्याची चौकशी व्हायलाच हवी पालिका आयुक्त आणि अतिरिक्त पालिका आयुक्त संध्याकाळी 6 नंतर पालिकेत कोणाला भेटत असतात हे पाहण्यासाठी सिसी टिव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासायला हवेत . मुंबई महापालिका भ्रष्टाचाराचे आहार बनली आहे त्यामुळे या महाघोट्याळ्याची चौकशी व्हायलाच हवी अशी मागणी त्यांनी केली आहे.त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील लढाई आता हातघाईवर आली आहे
बॉक्स
प्रभाग रचनेची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
सर्वोच्च न्यायालयाने भलेही पालिका प्रभाग रचनेबाबत नव्या सरकारने काढलेला अध्यादेश रद्दबातल ठरवलेला असला तरी या प्रभाग रचनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत . त्यामुळे पुन्हा एकदा सत्ताधारी शिंदे भाजपा गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष टिपेला पोचणार आहे .
बॉक्स
विधी मंडळाच्या पायऱ्यांवर राढा
पावसाळी अधिवेशनात सरकारच्या विरुद्ध आक्रमक असलेले विरोधक अजूनही विधी मंडळाची पायरी सोडायला तयार नाहीत . त्यामुळे आज याच पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात. राडा झाला पन्नास खोके एकदम होके या विरोधकांच्या टीकेला वाझेचे खोके मातोश्री ओके दादांना खोके बारामती ओके अशा घोषणा दिल्या त्यानंतर दोन्हीकडचे आमदार एकमेकांना भिडले आणि राडा झाला

error: Content is protected !!