भिवंडीत बनावट नोटा बनविणारी टोळी जेरबंद करण्यात शांतीनगर पोलिसांना यश -2 लाख 19 हजार रुपयांच्या नोटा यंत्रसामुग्री जप्त
भिवंडी दि 25 (आकाश गायकवाड ) विविध गुन्हेगारी घटनां मध्ये वाढ होत असतानाच शहरात बनावट नोटा बनवून चलनात
आणण्याच्या इराद्याने कार्यरत असणारी टोळी उध्वस्त करण्यात शांतीनगर पोलिसांना यश मिळाले असून या टोळी च्या ताब्यातून 500 व 100 रुपये दराच्या 2 लाख 19 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटा व नोटा छपाई साठी उपयोगात आणला जाणार कागद प्रिंटर ही यंत्रसामुग्री जप्त करण्यात यश मिळविले आहे .
शांतीनगर पोलीस ठाण्यातील पो उप निरी रवींद्र पाटील यांना साईबाबा मंदिर कल्याण रोड या परिसरात एक इसम बनावट नोटा एका व्यक्तीस देण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली असती वरिष्ठ पो निरी शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावून कारवाई करीत अहमद नाजम नाशिककर वय 32 यास ताब्यात घेत त्याच्या ताब्यातून एक लाख किमतीच्या 500 दराच्या बनावट नोटा जप्त करीत त्यास ताब्यात घेत चौकशी दरम्यान त्याचे साथीदार मोहम्मद शफीक अश्फाक अहमद अन्सारी वय 35, व चेतन एकनाथ मेस्त्री वय 41 यांना अटक करीत त्यांच्या ताब्यातून 1 लाख 19 हजार 500 किमतीच्या 500 रुपये दराच्या नोटां सह बनावट नोटा बनविण्यासाठी लागणारे लॅपटॉप,प्रिंटर,लॅमिनेटर,तयार करण्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर प्रिंटिंग चे कागद अर्धवट प्रिंट केलेल्या रु 500 व 100 दराच्या नोटा असा एकूण 2 लाख 70 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करीत तिन्ही आरोपीं विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करीत न्यायालयात हजर केले असता 28 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी ठोठाविण्यात आली आहे .या मध्ये विशेष म्हणजे चेतन एकनाथ मेस्त्री हा कॉम्प्युटर सायन्स या विषयात पदवीधर असून त्याने युट्युब वरील बनावट नोटा बनविण्याचे व्हिडीओ बघून हा प्रयत्न केला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली