उत्तर प्रदेशातील कुशीनगर मध्ये बनावट नोटांचा पर्धाफाश
! १० जणांच्या टोळीला अटक ४ फरार
कु शीनगर – उत्तर प्रदेशातील कुशीनगर मध्ये बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला . या प्रकरणी समाजवादी पक्षाच्या लोहिया ब्रिगेडच्या काही अटक करण्यात आली असून चारजण फरार आहेत
उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा मार्केटमध्ये आल्याचे समजताच मुख्यमंत्री योगी यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले त्यानंतर कुशीनगर मध्ये एका ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून बनावट नोटा बनवण्याच्या साहित्यासह मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा जप्त केल्या तसेच या प्रकरणी लोहिया वाहिनीचा रफिक खान उर्फ बबलू यांच्यासह १० जणांना अटक करण्यात आली . बबलू हाच या टोळीचा सूत्रधार असून नेपाळ आणि उत्तर प्रदेशातील सीमावर्ती भागातून हे रॅकेट ऑपरेट केले जात होते अटक आरोपींमध्ये नौशादखान , मोहम्मद रफी, औरंगजेब, परवेझ इलाही , शेख जलालउद्दीन ,हाशिम खान सिराज हाशमी आदींचा समावेश आहे . तर चारजण फरार आहेत
