ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महापालिकामुंबई

कामाठीपुरा रेड लाईट क्षेत्रात कोविड-19 लसीचा दुसरा डोस-वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ शैलेंद्र गुज्जर यांचे विशेष प्रयत्न .

मुंबई-कामाठीपुरातील रेड लाईट क्षेत्रामध्ये COVID-१९ लसीकरणाचे गरज समजून घेण्यासाठी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ शैलेंद्र गुज्जर यांनी शनिवार दिनांक २२ ऑक्टोबर रोजी कोविड -19 लसीकरणाच्या दुसऱ्या डोसची सेवा देण्यात आली . अपने आप वूमेन्स कलेक्टिव्ह, मंजू व्यास (सी.ई.ओ.) आणि पूनम अवस्थी (फील्ड डायरेक्टर) यांच्याशी संवाद साधून लसीकरण पार पडले . या वेळी डॉ.शैलेश पोळ, डॉ.दर्शन पाटील, डॉ.इबाद सय्यद हे उपस्थित होते.

अपने आप वूमन’स कलेक्टिव्ह (AAWC) गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ रेड-लाइट भागात काम करत असलेली तस्करीविरोधी संघटना आहे आणि मुली आणि महिलांच्या पुनर्वसन-कार्य काम करते. रेड-लाईट क्षेत्रातील बहुसंख्य वेश्याव्यवसायात काम करणाऱ्या महिला लाभार्थ्यांना AAWC द्वारे कोविड -19 लसीकरणाच्या पहिल्या डोसची आधीच सेवा देण्यात आली होती आणि ठरल्याप्रमाणे २५ ऑक्टोबर रोजी दुसरे डोस लसीकरण शिबीर कामाठीपुरा येथील 11 व्या गल्लीत पार पडले. डॉ शैलेश, डॉ इबाद, डॉ मारिया यांच्यासह ७ महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते. AAWC आउटरीच टीमने परिश्रमपूर्वक स्थापित केलेल्या ताळमेळामुळे शिबीरमध्ये १३२ लाभार्थ्यांना कोविड-१९ लसीकरणाचा दुसरा डोस देण्यात आला. महिला लाभार्थी, बीएमसी ई-विभाग आणि अपने आप विमेन्स कलेक्टिव्ह यांच्या सहकार्याने आणि समन्वयाने हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले.

error: Content is protected !!