ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

जरांगे व मराठा समाजाने भाजप पासून सावध राहावे – उद्धव ठाकरे

मुंबई : आज मुंबईत दोन दसरा मेळावे झाले दोन्हीकडे फुल गर्दी होती यावेळी शिवाजी पार्कच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी बोलताना जरांगे पाटील व मराठा समाजाने भाजप पासून सावध राहावे असे सांगितले
शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणापासून ते राज्य आणि केंद्र सरकारच्या कारभारावर स्पष्ट भाष्य केले. एक लवाद जर सुप्रीम कोर्टाचे ऐकत नसेल तर देशात लोकशाही राहणार आहे की नाही असा खडा सवालही त्यांनी यावेळी केला. ज्यांनी पाशवी बहुमत मिळते अशी लोक देशासाठी घातक असतात. हिटलर हे त्याचे उदाहरण असल्याचे सांगत ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका केली.
शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचे अभिनंदन केले. जरांगे यांनी धनगरांच्या आरक्षणाच्या मुद्याला पाठिंबा दिला. जातीमध्ये फूट पाडण्याचा भाजपचा डाव उधळून लावण्याचा प्रयत्न केल्याबद्दल जरांगे यांचे अभिनंदन करत असल्याचे ठाकरे यांनी म्हटले. मराठा आरक्षणाची मागणी मान्य करण्यासाठी संसदेच्या अधिवेशनात विशेष कायदा का केला नाही असा सवालही त्यांनी केला. जरांगे यांनी भाजपपासून सावध राहावे. ही लोक फूट पाडत असल्याचे ठाकरे यांनी म्हटले. अंतरवाली सराटी गावात लाठीचार्ज करण्याचा, गोळीबार करण्याचा आदेश कोणत्या जनरल डायरने केला असा सवालही ठाकरे यांनी केला.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे नाव न घेता टीका केली. सर्वोच्च न्यायालयाने यांचे कानपट फोडले. तरी सकाळी उठून काही झालं नसल्यासारखं वागतात. एक लवाद जर सुप्रीम कोर्टाचे ऐकत नसेल तर देशात लोकशाही राहणार आहे की नाही, असा उद्गविन सवाल ठाकरे यांनी केला. भारत मातेची लोकशाही टिकणार की नाही ? ३० तारखेला बघू.. जनतेच्या न्यायालयात जाऊ द्या असं मी म्हणत असल्याचे ठाकरे यांनी म्हटले.

error: Content is protected !!