एस टी संपात सरकार आक्रमक आजपासून कारवाईला सुरुवात
मुंबई/ सरकारने देऊ केलेली अंतरिम पगारवाढ नाकारून संप सुरूच ठेवल्याबद्दल आता सरकार चिडले असून आता प्रवाशांच्या हिताकडे लक्ष देऊन एस टी बस सेवा कोणत्याही परिस्थितीत सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे त्यामुळे कामावर न परतणाऱ्या संपकरी कर्मचाऱ्यांवर आता निलंबन नव्हे तर बडतर्फिची कारवाई शुक्रवार पासून सुरू होण्याची शक्यता आहे
दरम्यान एस टी कामगारांनी आता सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांना दूर करून शशांक राव यांना जवळ केले असून शशांक राव यांनी संपाला सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे त्यामुळे एस टी क्या संपाला आता बेस्ट कर्मचाऱ्यांची सुधा साथ मिळू शकते.
राज्य सरकारने विलीनीकरंनावर अभ्यास करण्यासाठी जी समिती नेमकी होती तिचा अहवाल येईपर्यंत एस टी कर्मचाऱ्यांना४१ टक्के अंतरिम पगारवाढ जाहीर केली होती. त्यानुसार १० वर्ष सेवेत असणाऱ्यांना ५ हजार तसेच बेसिक २२०० म्हणजेच ७२०० रुपये वाढ मिळणार होती ११ते २० पर्यंत सेवेत असणाऱ्यांना ४हजार तर २० वर्षांपेक्षा अधिक काळ सेवेत असणाऱ्यांना २५०० रुपये वाढ मिळणार होती शिवाय बेसिक आणि डी ए सुधा राज्य सरकारी कर्मचारी प्रमाणे मिळणार होता पण एस टी कामगारांनी ही ऑफर ते स्वतःच आताा धुडकावून अडचणीत आणले आहेत