कुर्ल्याचे गांधी मैदान अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त
मुंबई/ कुर्ल्यातील प्रसिद्ध गांधी मैदानातील अतिक्रमणे काढण्यात अखेर पालिका आणि पोलिसांना यश आले असून अखेर हे मैदान पालिकेच्या ताब्यात आले आहे आता या मैदानाचे सुशोभीकरण करून ते जनतेच्या हिताच्या कामासाठी वापरले जाणार आहे
स्वातंत्र्य संग्राम असो की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो या सर्व लढ्यांचे साक्षीदार असलेले कुरल्याच्या गांधी मैदानात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले होते त्यामुळे हे अतिक्रमण हटवण्यासाठी जेष्ठ कार्यकर्ते प्रभुदेसाई तसेच त्यांच्या कुर्ल्यातील सहकाऱ्यांनी प्रयत्नांची शिकस्त केली राज्य सरकार पासून पालिका आणि पोलीस प्रशासन सर्वांना निवेदने दिली पण कुणीही दाखल घेत नव्हते . अखेर या लढ्याला काही आर र्टी आय कार्यकर्त्यांची साथ मिळताच लढा तीव्र झाला आणि अखेर पोलिसांच्या मदतीने हे अतिक्रमण हटवण्यात असेल आणि २५०५ चौरस मीटर ची ही जागा जिल्हाधिकाऱ्यांनी पालिकेच्या ताब्यात दिली. आता या अतिक्रमणाला पालिकेतील कोणाचे आशीर्वाद होते आणि कोणामुळे ही अतिक्रमणे झाली आणि टिकली याची चौकशी करावी अशी मागणी मुंबईकर जनता करीत आहे.