दिशा सालीयन बाबत सीबीआयचा खुलासा
दिल्ली/ दिशा सलीयांन प्रकरण आम्ही कधीही हाताळले नाही त्यामुळे या बाबतच्या ज्या बातम्या पसरल्या आहेत त्या बिनबुडाच्या असल्याचा खुलासा सीबीआयने केला आहे सीबीआयचा या खुलाशामुळे आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे .
दिशा सलियांन प्रकरणात सीबीआयचा निष्कर्ष अशा बातम्या पसरल्या होत्या . पण आमच्या नावाने पसरलेल्या या बातम्या बिनबुडाच्या आहेत .असा खुलासा आज सीबीआयने केला आहे.सुशांत सिंग राजपूत याची सेक्रेटरी दिशा सालियांन हीचा इमारती वरून पडुन मृत्यू झाला होता मात्र हा अपघात नसून हत्या असल्याचा संशय राणे पिता पुत्रांनी केला होता आणि आता तर राहूल शेवाळे याने हे प्रकरण उकरून काढताना रिया चौधरीला ए यु नावाने 44 फोन आले होते . हे ए यू म्हणजे आदित्य उद्धव असा संशय व्यक्त करण्यात आला होता . तसेच या प्रकरणी सीबीआय चौकशी करीत आहे असे म्हटले जात होते .पण आज सीबीआयने हात झटकल्याने आदित्यला दिलासा मिळाला आहे .