प्रजासत्ताक दिन शासकीय सोहळ्यात राज्यपाल कोश्यारी यांची राष्ट्रध्वजाला मानवंदना
भारतीय प्रजासत्ताकाच्या ७२व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी पार्क मुंबई येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रीय ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी राज्यपालांनी राज्यातील जनतेला उद्देशून मराठीतून संबोधन केले.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुंबई शहराचे पालक मंत्री अस्लम शेख, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोर्हे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, पोलीस महासंचालक संजय पांडे, महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल, पोलीस आयुक्त हेमंत नागराळे, सैन्य दलाचे वरिष्ठ अधिकारी, शासकीय अधिकारी व निवडक निमंत्रित उपस्थित होते. राज्यपालांनी यावेळी निमंत्रितांची भेट घेतली व प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
राजभवन येथे ध्वजारोहण
तत्पूर्वी राज्यपाल कोश्यारी यांनी राजभवन येथे राष्ट्रध्वज फडकवला व राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी राजभवनातील कर्मचारी, अधिकारी तसेच राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांनी राष्ट्रगीत म्हटले