जरांगे पाटलाना आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी नाकारली
मुंबई/ मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या वेशीवर येवून धडकलेल्या जरंगे पाटील यांना आझाद मैदानात तसेच मुंबईच्या इतर मैदानात सुधा आंदोलनाची परवानगी मुंबई पोलिसांनी नाकारली आहे. त्यांना नवी मुंबईच्या एका मोठ्या मैदानात शांततेने आणि न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून आंदोलन करण्यास सांगण्यात आले आहे त्यामुळे मुंबईत येऊ पाहणाऱ्या मराठा आंदोलकांची मोठी गोची झाली आहे.
जरांगेना परवानगी नाकारताना पोलिसांनी सांगितले आहे की आझाद मैदानाची क्षमता पाच ते सहा हजारांची आहे .तर आंदोलकांची संख्या लाखोंच्या तुलनेत आहे.दुसरी महत्वाची बाब म्हणजे मुंबईत रोज 70 लाख प्रवासी रेल्वेने प्रवास करतात तसेच खाजगी व सरकारी वाहनाने प्रवास करणाऱ्यांची संख्या सुधा परचांड आहे त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनाने मुंबईत वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते म्हणूनच मुंबई पोलिसांनी जरांगेणा परवानगी नाकारली आहे
