दिवंगत मनोहर जोशींसह अभिनेते अशोक सराफ यांच्यासह १४३ जणांना पद्म पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली/ प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते.महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर जोशी अभिनेते अशोक सराफ दिदर्शक शेखर कपूर यांना पद्म पुरस्काराने गौरवण्यात आले. यंदाही प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. भारतरत्न पुरस्कारानंतर पद्म पुरस्कार हा प्रतिष्ठेचा मानला जातो. देशाच्या सर्वोच्च नागरिक सन्मानांपैकी एक असलेला पद्म पुरस्कार हा तीन श्रेणींमध्ये दिला जातो. पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारानं गौरविण्यात येणाऱ्या मान्यवरांच्या नावांची केंद्र सरकारच्या वतीनं घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये राजकारण, कला, क्रीडा, सामाजिक कार्य इत्यादी क्षेत्रात काम करणाऱ्या देशातील एकूण १३९ मान्यवरांचा पद्म पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या या पद्म पुरस्कारांमध्ये ७ मान्यवरांचा पद्म विभूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. तर माजी मुख्यमंत्री मनोज जोशी, पंकज उधास, सुशील मोदी यांसह १९ जणांना पद्मभूषण प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ, अच्युत पालव, अश्विनी भिडे-देशपांडे यांसह तब्बल ११३ जणांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना त्यांच्या राजकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच भारतातील उत्कृष्ट गझल गायक पंकज उधास यांनाही मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच बॉलिवूडचे अतिशय प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक शेखर कपूर यांना त्यांच्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीसाठी पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.