ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

नियोजित सी लिंक मुळे अलीबागच्या विकासाला कलाटणी मिळणार

मुंबई-करंजा-रेवस सी-लिंकची ४० वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या कामासाठी ९०० कोटींची निविदा काढली आहे. त्यामुळे त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. या सी-लिंकमुळे नवी मुंबई ते आलिबाग यांच्यातील अंतर ४० किलोमीटरने कमी होणार आहे. त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी रेवस-रेड्डी या सागरी मार्गाची संकल्पना मांडली होती. त्यात त्यांनी कोकण किनारपट्टीत खाड्यांवर अनेक पूल बांधले. त्याचाच एक भाग म्हणून अलिबाग आणि उरण तालुक्यांना जोडणाऱ्या रेवस-करंजा पुलाच्या बांधकामालाही त्यांनी मंजुरी दिली होती. निधीचीही तरतूद केली होती. परंतु अंतुलेंचे मुख्यमंत्रीपद गेले आणि पुलाचे काम रखडले. त्यानंतर ५ दशकांनी या सीलिंगच्या कामाला सरकारने मंजुरी दिली. त्यासाठी शिवसेनेने पाठपुरावा केला. महाविकास आघाडी सरकारने एक पाऊल पुढे टाकल्याने रेवस-करंजा फुलाचे स्वप्न साकारणार आहे. या सी-लिंकमुळे जेएनपीटी ते आलिबाग हे अंतर ३६ तर मांडवा ते वाशी आणि रेवस ते वाशी हे अंतर ३९ किमीने कमी होणार आहे. या पुलाची लांबी २.४० किलोमीटर आहे. त्यामुळे अलिबागच्या विकासाला कलाटणी मिळणार आहे.

error: Content is protected !!