ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

ए सी लोकल अर्थात पांढरा हत्तीवर प्रवाशांची दगडफेक


मुंबई-एसी लोकलचे प्रवासी भाडे सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यातच या लोकलमुळे सामान्य लोकलचे वेळापत्रक कोलमडले आहे. याचा फटका प्रवाशांना बसतो. त्यामुळे त्यांच्या संतापाचा फटका एसी लोकलला बसत आहे. यातून झालेल्या दगडफेकीत एसी लोकलच्या काचा फुटून नुकसान होत आहे, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मध्य रेल्वेवर सध्या ६० एसी लोकलच्या फेऱ्या चालवल्या जातात. काही दिवसांपूर्वीच ठाणे-दिवा ५ व्या आणि ६ व्या मार्गिकेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ३६ नव्या लोकल फेऱ्या सुरु करण्यात आल्या. यातील एसी आणि आधीच्या मिळून एकंदर ६० एसी लोकल मध्य रेल्वेवर चालवल्या जातात. त्यांचे भाडे जास्त असल्यामुळे त्या रिकाम्या धावतात. एसी लोकलमुळे साध्या लोकलचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्याचा मनःस्ताप प्रवाशांना सहन करावा लागतो. त्यात एका एसी लोकलच्या ३ काचा दगडफेकीत फुटल्या आहेत. हा प्रकार त्यातूनच घडला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. एसी लोकलचे भाडे कमी करण्यासंदर्भात निर्णय झालेला नाही. किमान फर्स्ट क्लासच्या प्रवाशांना एसी लोकलमध्ये त्याच तिकिट व पासावर प्रवेश द्यावा, अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे. ती मान्य झाल्यास एसी लोकलला प्रवासी मिळू शकतील, असे त्यांचे मत आहे.

error: Content is protected !!