ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मराठा आरक्षण वातावरण तापले फडणवीसवर गंभीर आरोप करून जरांगे मुंबैला रवाना

जालना – आम्ही २४ तारखेला शांततेत आंदोलन केले, तरीही सरसकट गुन्हे दाखल करण्यात आले. मराठा आंदोलकांविरोधात पोलिसांचा वापर केला जातोय. न्यायालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुणरत्न सदावर्तेंना पुढं केलं. पहिल्यांदाही तोच होता 13 टक्के आरक्षण रद्द करायला. मागील आठवड्यात सदावर्तेंनी याचिका दाखल केली आणि देवेंद्र फडणवीसांनी तिथे सरकारी वकिलाला पाठवून हस्तक्षेप केला, असे आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले आहेत. मनोज जरांगे पाटील रविवारी चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. ते अंतरवाली सराटी येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

मनोज जरांगे पाटील गेल्या १६ दिवसांपासून उपोषण करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून जरांगे पाटील यांचे सहकारीचं त्यांच्यावर आरोप करत होते. दरम्यान, आज जरांगेंकडून सर्वांना चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. देवेंद्र फडणवीसांवर जरांगे पाटलांना हल्लाबोल केलाय. शिवाय, मी त्यांच्या सागर बंगल्याच्या दिशेने निघालो असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केलय. दरम्यान, जालन्यात पत्रकार परिषदेवेळी जरांगे पाटील पाणी पिले असून ते आता मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मात्र, गावकऱ्यांकडून त्यांना जेवण करण्यासाठी आग्रह केला जात आहे. मात्र, जरांगेंनी मी उपोषणावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. ?
मनोज जरांगे पाटील म्हणाले,”एखाद्या खासगी माणसाने याचिका दाखल केली की, त्यामध्ये सरकारला हस्तक्षेप करता येत नाही. सरकारला वेगळी याचिका दाखल करावी लागते. मात्र, तरिही देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर न्यायालयाने मला उपचार घेण्यास सांगितले. मी न्यायालयाचे मान ठेवत उपचार घेतले. मी मराठा समाजाचा मान ठेवला. वारकरी संप्रदायाला मानतो, त्यांच्या हातानी पाणी पिलो. त्यानंतर न्यायालय शांत झालं. मराठ्यांच्या याचिकेवरील सुनावणीसाठी 13 मार्च तारिख देण्यात आली होती. मात्र, यातही हस्तक्षेप करण्यात आला. एका रात्रीत सुनावणीची तारिख बदलण्यात आली. एका रात्रीत यांनी न्यायालयाने दिलेली तारिख बदलली. २४ तारखेला रास्तारोको करता येऊ नये म्हणून 23 तारिख करण्यात आली, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

error: Content is protected !!