मंत्र्यांच्या एसओडीबाबत मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका
मुंबई/मंत्र्यांचे स्वीय सहाय्य किंवा एसओडी यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसारच यापुढे केली जाईल असे दिसत आहे .कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत कठोर निर्णय घेतला आहे. वास्तविक कायद्यानुसार मंत्र्यांचे पीए किंवा एसओडी हे संबंधित मंत्र्यांच्या मर्जीतले असतात त्यामुळे काही मंत्री आपापल्या मर्जीनुसार त्यांची नियुक्ती करतात परंतु अशा नियुक्तीमुळे भ्रष्टाचाराला वाव मिळतो महायुती मधील राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी नुकताच एक दावा केला आहे की शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या एसओडीकडून मिटकरीकडे पाच लाखाची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे महायुतीत मोठी खळबळ मानली होती माणिकराव कोकाटे सारख्या भ्रष्टमंत्र्यांनी आपल्या सहाय्यक आणि एसओडी बाबत या मागण्या केल्या होत्या त्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस आता चांगलेच संतापले आहेत यापुढे सहाय्यक आणि एसओडी यांच्या नियुक्ती बाबत कोणाचीही मनमानी चालू देणार नाही अशा शब्दात त्यांनी भ्रष्ट माणिकराव कोकाटे यांना खडवल्याचे समजते
