बोगस प्रमाणपत्राच्या आधारे स्पोर्ट कोट्यातून मिळवल्या सरकारी नोकऱ्या- सरकारी सेवेत स्पोर्ट माफिया
मुंबई/ शिक्षण परीक्षा भरती घोटाळ्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता त्यानंतर आता तसाच एक भयंकर घोटाळा उघडकीस आला असून खेळाडू असल्याचे बोगस प्रमाणपत्र घेऊन काहींनी सरकारच्या विविध खात्यात नोकऱ्या मिळवल्या होत्या त्यांची आता चौकशी सुरु झाली असून आता पर्यंत 15 जणांना अटक करण्यात आली आहे तर अजून आणखी काही सरकारी नोकरी मिळवणाऱ्या लोकांना अटक होण्याची शक्यता आहे .
सरकारी सेवेत स्पोर्ट साठी 5 टक्के आरक्षण असते. विविध खेळातील जे उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू असतात अशा उमेदवारांसाठी सरकारच्या वेगवेगळ्या विभागात नोकरीची संधी असते पण त्याचाच काही लोकांनी गैर फायदा घेत बोगस स्पोर्ट सर्टिफिकेट घेऊन नोकऱ्या मिळवल्या त्यासाठी एक बोगस सर्टिफिकेट देणाऱ्या लोकांचे एक रॅकेट सक्रिय होते .स्पॉट बॉल या खेळाचे नोकरीसाठी बोगस सर्टिफिकेट बनवण्यात आले होते मात्र ही सर्टिफिकेट जेंव्हा व्हेरिफिकेशन साठी स्पॉट बॉल असोशियेशन कडे पाठवण्यात आली तेंव्हा ही सर्टिफिकेट आम्ही दिलेली च नाहीत असे असोसिएशनकडून संबंधित विभागाला कळविण्यात आले त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू झाली तेंव्हा हा भयंकर घोटाळा उघडकीस आला विशेष म्हणजे बोगस स्पोर्ट सर्टिफिकेट घेऊन काही उमेदवारांनी मुंबई,ठाणे,पुणे,औरंगाबाद आणि नागपूर आदी ठिकाणी महसूल,नगरविकास,गृहनिर्माण,आरोग्य आणि गृह खात्यात सुधा नोकऱ्या मिळवल्या असून गृहमंत्रालय अंतर्गत येणाऱ्या पोलीस खात्यात अशा बोगस सर्टिफिकेट वाल्या बोगस खेळाडूंची संख्या अधिक असल्याचे समजते .मात्र कलम 467 अंतर्गत हा मोठा गुन्हा असून या गुन्ह्यात १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे त्यामुळे स्पोर्टचा कोट्यातून बोगस सर्टिफिकेट च्या आधारे नोकऱ्या मिळवणाऱ्या लोकांचे धाबे दणाणले आहेत कारण त्यांच्या नोक न्या जाणार आहेत आणि त्यांना अटकही होणार आहे