औरंगाबाद मध्ये जमावबंदी लागू -पोलिसांचा मनसेला शह राज ठाकरेंची सभा रद्द ?
औरंगाबाद – भोंगा आणि हनुमान चालीसा वरून संपूर्ण महाराष्ट्रात तणावाचे वातावरण निर्माण झालेले असतानाच पोलीस प्रशासनाने 1 मे रोजी औरंगाबाद मध्ये होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेला बंदी घालण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे.त्यामुळे राज ठाकरे यांची सभा रद्द होण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे यांनी पाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्क मध्ये झालेल्या मनसेच्या मेळाव्यात मशिदींवरील भोंग्याणा विरोध करून या भोग्याच्या विरोधात मशिदींसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचे कार्यकर्त्यांना आदेश दिले होते .त्यावरून महाराष्ट्रात मोठे राजकीय वादळ उठलं आहे .याच दरम्यान राज ठाकरे यांनी ठाण्यात सभा घेऊन तिथेही हनुमान चालीसा पठण करण्याचा तसेच मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता तसेच 1 मे रोजी औरंगाबाद मध्ये जाहीर सभा घेण्याची घोषणा केली होती त्यानंतर माणसे कार्यकर्त्यांनी सभेची तयारी केली परवानगीसाठी आवश्यक ती कागदपत्रे पोलिसांना दिली मात्र त्यांना परवानगी बाबत पोलिसांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही आणि त्यानंतर काल औरंगाबाद मध्ये जमावबंदी लागू करण्यात आली त्यामुळे आता राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळणे कठीण आहे .