ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

कोकणातील रिफायनरीवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये रण पेटले


राजापूर -रिफायनरी प्रकल्प कोकणातील नियोजित ठिकाणी होईल. महाराष्ट्रासाठी आम्ही प्रकल्प पूर्ण करणारच अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आम्हाला हा प्रकल्प प्रतिष्ठेचा विषय करायचा नाही. महाराष्ट्राच्या विकास महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. आंदोलकांच्या शंकांचे निरसन करू, असेही फडणवीस यांनी म्हटले. ‘एबीपी माझा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी विविध मुद्यांवर भूमिका स्पष्ट केली.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्प सुरू करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. प्रकल्पाच्या ठिकाणच्या मातीचे परीक्षण सुरू करण्यात आले आहे. या कामाला स्थानिकांकडून मोठा विरोध सुरू करण्यात आला आहे. अनेक ग्रामस्थांनी रिफायनरीविरोधात आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बारसूमधील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एबीपी माझाला विशेष मुलाखत दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, या रिफायनरीमुळे निसर्गाला कोणताही धोका नाही. आम्हाला हा रिफायनरी प्रकल्प प्रतिष्ठेचा विषय करायचा नाही. महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. आंदोलकांच्या मनातील शंका दूर करण्याची तयारी असल्याचे त्यांनी म्हटले. बारसू गावात सध्या रिफायनरीच्या ठिकाणी बोअर मारले जात आहेत. ही जागा रिफायनरीसाठी योग्य असल्याचे अहवाल आल्यानंतर रिफायनरी उभी राहणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. हा प्रकल्प पर्यावरणपूरक असून निसर्गाला कोणताही धोका पोहचणार नसल्याचे त्यांनी म्हटले.-

error: Content is protected !!