शिवसेनेचा दुसरा उमेदवार जाहीर कोल्हापूरच्या संजय पवारांना उमेदवारी
राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार अटळ
मुंबई/ राज्य सभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने आपला दुसरा उमेदवार जाहीर केल्याने आता या निवडणुकीत घोडेबाजार अटळ आहे दरम्यान शिवसेनेने कोल्हापूरचे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते संतप्त झाले असून शिवसेनेला या गद्दारीची किंमत चुकवावी लागेल असा इशारा दिला आहे
संभाजी राजे यांनी हातावर शिवबंधन बांधण्यास नकार दिल्याने त्यांना राज्यसभेची उमेदवारी नाकारण्यात आली त्यानंतर काल शिवसेनेने आपला दुसरा उमेदवार जाहीर केला तर दुसरीकडे सहाव्या जागेसाठी संभाजीराजे सुधा शिवसेना सोडून इतरांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत.सेनेकडे 56 आमदार आहेत त्यामुळे त्यांचा पहिला उमेदवार सहज निवडून येऊ शकतो मात्र दुसऱ्या उमेदवारासाठी त्यांच्याकडे महाविकाम आघाडीची 28 मते आहेत पण निवडून येण्यासाठी 42 मते लागणार त्यामुळे उर्वरित 14 मतांसाठी त्यांना घोडेबाजार आधार घ्यावा लागणार तीच परिस्थिती संभाजी राजे यांच्या बाबतीत आहे त्यांनीही घोडेबाजार चां आसरा घ्यावा लागणार दरम्यान संभाजीराजांचे समर्थक शिवसेनेवर भयंकर चिडले आहेत उद्धव ठाकरे संभाजी राजे साठी तयार होते पण संजय राऊत आणि शरद पवार यांनी विश्वासघात केला असा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे .