ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

पवारांच्या भेटीमुळे केजरीवालचे बळ वाढले.


मुंबई : आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन लोकशाही वाचवण्यासाठी आणि संसदेत दिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला विरोध करण्यासाठी पाठिंबा देण्याची विनंती केली. पवारांनीही त्याक्षणी दिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील असा शब्द केजरीवाल यांना दिला. बुधवारी केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन हीच व्यथा मांडली होती. ठाकरेंनीही तत्काळ केजरीवालांना मदतीचा शब्द दिला होता. ठाकरे पवारांनी केजरीवालांना शब्द दिल्यानंतर त्यांचा मुंबई दौरा यशस्वी झाल्याचं बोललं जातंय.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे केजरीवाल यांनी आपच्या शिष्टमंडळासह पवार यांची भेट घेतली. भेटीनंतर केजरीवाल-पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी केंद्रातील भाजप सरकार आमदारांच्या घोडे बाजारकरुन ईडी आणि सीबीआयसारख्या केंद्रीय एजन्सींचा वापर करून भय निर्माण करण्यासाठी आणि लोकप्रिय सरकारच्या विरोधात अध्यादेश जारी करून गैरभाजप सरकार पाडण्यासाठी अन्यायकारक मार्ग वापरत असल्याचे सांगितले. दिल्लीत कायदेशीररीत्या निवडून आलेल्या आप सरकारचे अधिकार मर्यादित करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली दुरुस्ती विधेयक २०२३ अंमलात आणले आणि त्या प्रभावाखाली एक अध्यादेश जारी केला आहे.

error: Content is protected !!