ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

आज लोकसभा अध्यक्ष पदाची निवडणूक एनडीए चे पारडे जड


नवी दिल्ली/आज लोकसभा अध्यक्ष पदाची निवडणूक होणार असून ,एनडीए आघाडीतर्फे भाजपाचे ओम बिर्ला यांनाच पुन्हा अध्यक्षपदासाठी मैदानात उतरवण्यात आले आहे. तर इंडिया आघाडी तर्फे काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार के. सुरेश यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून मैदानात उतरवण्यात आले आहे. तूर्तास एनडीए आघाडीकडे २९६ खासदारांचे संख्याबळ आहे तर इंडिया आघाडीकडे २३४ खासदारांचे संख्याबळ आहे. ही आकडेवारी पाहता ओम बिर्ला यांचा विजय निश्चित मानला जात आहे. वास्तविक अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीने सहकार्य करून निर्विवाद लोकसभा अध्यक्ष निवडावा, अशी सत्ताधारी एनडीए आघाडीची इच्छा होती. परंतु काँग्रेसने लोकसभेची उपाध्यक्ष पद विरोधी पक्षांना द्यावे अशी मागणी लावून धरली. आणि ती मागणी सत्ताधारी पक्षाकडून मान्य झाली नाही. म्हणून काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा निश्चय केला. त्यामुळे आज लोकसभा अध्यक्ष पदासाठी एनडीएचे ओम बिर्ला विरुद्ध इंडिया आघाडीचे के .सुरेश यांच्या लढत होणार आहे

error: Content is protected !!