घाटकोपर होर्डिंग दुर्घटने प्रकरणी रेल्वेचे पोलीस आयुक्त निलंबित
मुंबई/घाटकोपर होल्डिंग दुर्घटने प्रकरणी रेल्वेच्या जीआरपी चे पोलीस आयुक्त कैसर खलीद यांच्यावर कामात गलथानपणा केल्याचा आरोप ठेवून त्याना निलंबित करण्यात आले आहे
13 मे रोजी घाटकोपर मध्ये एका पेट्रोल पंपावर मोठे लोखंडी होर्डिंग पडून १३ जणांचा मृत्यू झाला होता तर ७० लोक जखमी झाले होते .या घटनेची सरकारने गंभीर दखल घेऊन चौकशी समिती नेमली होती .तर रेल्वेने ही खाते अंतर्गत चौकशी सुरू केली होती .दरम्यान हे होर्डिंग लावण्यासाठी इगो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने रेल्वेचे पोलीस आयुक्त कैसर खलीद यांना ४६ लाख रुपयांची लाच दिली होती. असा गंभीर आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या याने केला होता. तसेच त्यांना निलंबित करण्याची मागणी गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती. दरम्यान रेल्वेचा तपास पूर्ण होऊन याबाबतचा चौकशी अहवाल आला. हा चौकशी अहवाल राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे देण्यात आला. त्यानंतर तो सरकारला पाठवण्यात आला. सरकारने या अहवालातील सर्व माहिती लक्षात घेऊन घाटकोपर होरडीग दुर्घटने प्रकरणी पोलीस आयुक्त कैसर खलिद यांना दोषी ठरवून त्यांच्यावर आज विलंबनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. दरम्यान या होर्डिंग प्रकरणात इंडिया कंपनीचा मालक भावेश भिडे याला यापूर्वी अटक करण्यात आलेली आहे.