तडकाफडकी बदली नाटयाला … राजकीय कुरघोडीची किनार
सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार सहायक अभिंयता चंदन डोंगरे याचा बदली आदेश सोमवार दिंनाक 6/4/2021 रोजी दुपारी आला आणि त्याच दिवशी सध्यांकाळी त्यानी आपला पदभार प्रभागाच्या आयुक्तांकडे सोपवून संध्याकाळी ई प्रभागातून निघून गेले. दुसर्या दिवशी घाटकोपर येथील आपरेशन विभागातील पदावर रूजू झाले. या तडकाफडकी बदली नाटयामुळे ई प्रभाग घनकचरा विभागात प्रंचड खळबळ माजली. प्रभागातील दुय्यम अभिंयता, जे.ओ, कर्मचारी, उपर्या संस्थाचे चालक-मालक सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला. अनेकांना दुसर्या दिवशी बदली बातमी समजताच भुवया उंचावल्या. डोंगरे यांनी बदली घेत आपला पदभार चार तासात सोडला याला पूर्व अनुभवानुसार राजकीय कुरघोडीचे शिकार होऊ नये यासाठी केला असावा असा तर्क मांडला जातोय. कारण एखादा अभिंयता बदली झाल्यास त्या प्रभागात कर्मचार्याकडून सत्कार घेऊन दुसर्या अभिंयतांच्या हाती कारभार सोपविला जातो. असा प्रघात आहे. असा प्रघात डावलत बदली नाटय घडल्याने अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहे .
पाहूया येणारा नविन सहायक अभिंयता अमित शेटये याच्यासाठी गब्बर उपर्या खाजगी संस्था आणि राजकीय अनेक आव्हाणं पुढे उभी राहिलेले दिसत आहेत .एकदरीत येता काळ परिश्रेचा आहे . त्यातून शेटये मार्ग कसा काढतात की पळतात हे पाहणे उत्सुकतेचे आहे.