ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
मनोरंजन

मराठी चित्रपट ‘राजकुमार’ गेल्या वर्षीच प्रदर्शित होणार होता.

राजकुमार’ यूट्यूबवर रिलीज झालेला मराठीतील पहिला चित्रपट ’

लॉकडाऊनमुळे त्याचे प्रदर्शन पुढे ढकलले गेले. आता परिस्थितीत सुधार होताना दिसत असल्यामुळे निर्मात्यांनी सिनेमा युट्यूबर प्रदर्शित केला आहे.
मुंबई : कोरोना आला आणि लॉकडाऊनमुळं सर्वच क्षेत्रं प्रभावित झाली. मनोरंजनाच्या क्षेत्रालाही मोठा फटका यामुळं बसला. या काळात अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात आले. अशात मराठी चित्रपट राजकुमार गेल्या वर्षीच प्रदर्शित होणार होता. मात्र, लॉकडाऊनमुळे त्याचे प्रदर्शन पुढे ढकलले गेले. आता परिस्थितीत सुधार होताना दिसत असल्यामुळे निर्मात्यांनी हा सिनेमा युट्यूबर प्रदर्शित केला आहे. राजकुमार प्रदर्शित केला आहे. हा सिनेमा निर्मात्यांनी वेगळ्या स्वरूपात रिलीज केला आहे, तो म्हणजे तुम्ही आधी सिनेमा बघा, बघुन झाल्यावर पैसे द्या, असा एक आगळा वेगळा प्रयोग या केला आहे.
’राजकुमार’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन समर्थ राज इडिगा यांनी केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, लॉकडाऊनमुळे थेटरला बंद आसल्या कारणाने निर्माते मोठ्या अडचणीत आले आहेत. राजकुमार हा मोठ्या बजेट आणि स्टारकास्टचा सिनेमा  ला रिलीज करण्याचे धाडस आम्ही फक्त प्रेक्षकांच्या भरवशावर दाखवले आहे, असं ते म्हणाले. यूट्यूबवर रिलिज केलेला हा पहिलाच मराठी चित्रपट असल्याचा दावा देखील इडिगा यांनी केला आहे.

error: Content is protected !!