ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

ग्राहकांच्या हक्क संरक्षणासाठी लवकरच दुरुस्तीचा हक्क कायदा


दिल्ली/ सरकार कधी कधी जनतेच्या हित लक्षात घेऊन कायदे करीत असते पण त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नसल्याने असे चांगले कायदेही परिणामकारक ठरत नाहीत उत्पादक विक्रेता आणि ग्राहक यांच्यातील समंव्यासाठी सरकार लवकरच दुरुस्तीचा हक्क कायदा आणणार आहे.या कायद्या नुसार उत्पादक किंवा विक्रेता जी वस्तू ग्राहकाला विकेल त्या वस्तूची संपूर्ण माहिती ग्राहकाला देणे बंधनकारक असेल उदाहरणार्थ एखाद्या वस्तू मध्ये जर काही बिघाड झाला तर ती वस्तू त्या ग्राहकाला दुरुस्त करता आली पाहिजे जेणेकरून ग्राहकाचा विकत घेतलेल्या वस्तूचा योग्य वापर करण्याचा आणि ती वस्तू जास्तीत जास्त काळ वापरण्याचा हक्क अबाधित राहील परदेशात हा कायदा अस्तित्वात आहे त्यामुळे तिथे उत्पादक विक्रेता आणि ग्राहक यांच्यात सहसा वाद होत नाहीत आणि प्रकरणे ग्राहक न्यायालय पर्यंत जात नाहीत . तोच प्रकार भारतात व्हावा अशी सरकारची इच्छा असल्याने हा कायदा करण्यात येणार आहे .

error: Content is protected !!