राष्ट्रवादीचे बबन शिंदे आणि शिवसेनेचे अर्जुन खोतकर पक्ष सोडण्याच्या तयारीत- फोडाफोडी सुरूच
मुंबई/ एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झालेले फोडाफोडीचे राजकारण सुरूच आहे काल राष्ट्रवादीचे बबन शिंदे यांनी फडणवीस यांची तर अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन पक्षांतराची तयारी सुरू केली आहे
शिवसेनेचे जालन्याचेआमदार आणि 100 कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी ई डी चां रडारवर असलेले अर्जुन खोतकर यांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली मात्र ही सदिच्छा भेट होती असे त्यांनी सांगितले मात्र ही सदिच्छा भेट नव्हती तर शिंदे गटात जाण्याची तयारी आहे असे आता समजते येत्या एक दोन दिवसात ते शिंदे गटात जातील तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे माडा चे आमदार बबन शिंदे यांनी माजी आमदार राजन पाटील यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आश्चर्याची गोष्ट म्हणजे रविवारी ते पक्षाध्यक्ष शरद पवारांना भेटले आणि त्यानंतर लगेचच त्यांनी फडणवीसां ची भेट घेतली त्यामुळे ते भाजप मध्ये जाण्याच्या तयारीत आहेत याचा अर्थ भाजपने सुरू केलेलं फोडाफोडीचे राजकारण यापुढेही असेच सुरू राहणार असल्याचे दिसत आहे .