महाराष्ट्रात पावसाने उडवला हाहाकार – १० जिल्ह्यांमधील शाळा कॉलेज आज बंद
बिल्डर आणि पालिका अधिकाऱ्यांच्या युतीने पुणे बुडवले
पुणे -राज्यात आज सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावलीये. शिवाय काही जिल्ह्यांना उद्या रेड अलर्टही जारी करण्यात आलाय. त्यामुळे अपत्कालीन परिस्थिती
सध्या रायगड जिल्ह्यातील अनेक नद्या ओसांडून वाहत आहेत, प्रशासन प्रत्येक बाबीवर लक्ष ठेवून आहे अशावेळी विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाकडून उद्या देखील शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय – तटकरे
ठाणे शहरात आज पहाटेपासूनच पावसाची संततधार सुरू असून एका दिवसात 180 मी.मी इतका पाऊस झालेला आहे. तसेच हवामानखात्याने रेड ॲलर्ट जाहीर केला होता, त्यानुसार पूर्वतयारी म्हणून आपत्कालीन यंत्रणा कोणत्याही परिस्थतीचा सामना करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहे. आज झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ठाणे महापालिकेतील आपत्कालीन कक्षास भेट देवून दिवसभरातील परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच उद्या देखील मोठी भरती असल्याने महापालिका हद्दीतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश आयुकतांना संबंधितांना दिले.
शुक्रवारी देखील मोठी भरती असून रेड ॲलर्ट जाहीर केला असल्याने महापालिका हद्दीतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचेही आयुक्तांनी यावेळी नमूद केले. तसेच नागरिकांकडून आपत्ती व्यवस्थापन कक्षास प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या दृष्टीने प्रभाग समिती निहाय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. शहरातील सखल भागात पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीकोनातून पंप बसविण्यात आले असून पुरेसे मनुष्यबळ व आवश्यक साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचेही आयुक्तांनी यावेळी सांगितले.
नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन विभागात 20 पेक्षा जास्त फोनची सुविधा 24×7 कार्यान्वित आहेत. तसेच आलेल्या प्रत्येक फोनच्या तक्रारीचे निवारण पूर्ण होईपर्यत संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला जात आहे.आज झालेल्या पावसामुळे नौपाडा- कोपरी परिसरातील पेढ्या मारुती मंदिर, वंदना सिनेमा परिसर, सिडको बस डेपो, चिखलवाडी, बारा बंगला, मेंटल हॉस्पिटल परिसर या ठिकाणच्या सखल भागात साचलेल्या पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप बसविण्याची कार्यवाही करुन पाण्याचा निचरा करण्यात आला. तसेच कोपरी नौपाडा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात परिमंडळ उपायुक्तांनी भेटी देवून सी 1 आणि सी 2 या धोकादायक व अतिधोकादायक इमारती रिकामी करण्याची कार्यवाही करण्यात आली.
वागळे प्रभाग समिती परिसरातील पडवळनगर, किसननगर, भटवाडी जनता झोपडपट्टी, श्रीनगर या परिसरात साचलेल्या पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून महापालिकेच्या आपत्कालीन विभागाचे कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आले होते.तसेच अतिवृष्टीमुळे मुंब्रा परिसरातील खडी मशीन रोड व भीमनगर येथील रस्ता खचल्यामुळे आपत्कालीन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदरची परिस्थिती नियंत्रणात आणून सदर ठिकाणचा रस्ता वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आला आहे. शहरात ठिकठिकाणी पावसामुळे उन्मळून पडलेली झाडे तातडीने हटविण्याची कार्यवाही सुरू आहे.अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन विभागास भेट देवून परिस्थितीचा आढावा घेताना आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, सचिन पवार, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वाय.एम. तडवी आदी.
