ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

उसाटणे घनकचरा प्रक्रिया प्रकल्पा संदर्भात महापालिका आयुक्त, पोलिस उपायुक्त, आमदार व ग्रामस्थ यांची बैठक संपन्न .

उल्हासनगर / प्रतिनिधी : अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागात असलेल्या उसाटणे गावात ३० एकर जागेवर डंपिंग ग्राउंडला शासनाने मंजुरी दिली असुन निसर्गाने आणि वन्यसृष्टीने नटलेल्या मलंगगड परिसराला धोका निर्माण झाला आहे. या डंपिंग ग्राउंड शेजारी गुरुकुपा विद्या मंदिर ही शाळा असून या शाळेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत .तसेच सभोवताली लोकवस्ती व आदिवासी वाडी असल्याने
ही जागा डंपिंग ग्राउंडकरिता देण्यास स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे
.

उल्हासनगर / प्रतिनिधी : अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागात असलेल्या उसाटणे गावात ३० एकर जागेवर डंपिंग ग्राउंडला शासनाने मंजुरी दिली असुन निसर्गाने आणि वन्यसृष्टीने नटलेल्या मलंगगड परिसराला धोका निर्माण झाला आहे. या डंपिंग ग्राउंड शेजारी गुरुकुपा विद्या मंदिर ही शाळा असून या शाळेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत .तसेच सभोवताली लोकवस्ती व आदिवासी वाडी असल्याने ही जागा डंपिंग ग्राउंडकरिता देण्यास स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

तेव्हा ग्रामस्थांसोबत संयुक्त बैठक घेऊन या डंपिंग ग्राउंड साठी जागा निश्चित करण्यासाठी उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ राजा दयानिधी यानी स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात न घेता डंपिंग ग्राउंडच्या जागेची मोजणी करण्याचे काम महापालिका प्रशासनाने चालू केल्याने याला तीव्र विरोध स्थानिक नागरिकानी दर्शवला होता. तर कल्याण पुर्वचे आमदार गणपत गायकवाड यानी,
या डंपिंग ग्राऊंड ची तीन वेळा पाहणी व मोजमाप करण्यासाठी गेलेल्या उल्हासनगर महापालिका अधिकाऱ्याना ग्रामस्थानी परत पाठवले होते .
सदर घटनेची दखल घेत उल्हासनगर महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यानी उल्हासनगर महापालिका मुख्यालयात २४ ऑगस्ट रोजी दुपारी उसाटणेकर ग्रामस्था सोबत बैठक आयोजित केली,या बैठकीत आयुक्त डॉ. राजा दयानिधी , उपायुक्त मदन सोंडे, पोलिस उपायुक्त प्रशांत मोहिते, आमदार गणपत गायकवाड, आमदार कुमार आयलानी, स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी उपस्थित होते, दरम्यान
१ सप्टेम्बर रोजी सदर घनकचरा प्रक्रिया प्रकल्पा साठी नियोजित जागेची पाहणी करण्यासाठी अधिकारी वर्ग जाणार आहेत, तर सदर जागेवर ग्रामस्थाशी चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाईल असा या बैठकीत निर्णय झाला अशी माहिती महापालिका उपायुक्त मदन सोंडे यानी दिली आहे .

error: Content is protected !!