ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
मुंबईराजकीय

गरीबांचे अश्रू पुसणे हीच शहीद ओमप्रकाश मिश्र यांना खरी श्रद्धांजली ; खासदार गोपाळ शेट्टी यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई, दि. (प्रतिनिधी) : गोरगरीब, दीनदलित, दुःखितांचे अश्रू पुसणे, त्यांना न्याय मिळवून देणे हीच खऱ्या अर्थाने शहीद ओमप्रकाश मिश्र यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत उत्तर मुंबई चे खासदार गोपाळ शेट्टी यांनी भारतीय जनता पक्षाच्या तसेच शहीद ओमप्रकाश मिश्र प्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. भारतीय जनता पक्षाचा कट्टर कार्यकर्ता व धडाडीचा नेता म्हणून ज्यांची बोरीवलीत ख्याती होती, अशा ओमप्रकाश मिश्र या तळागाळातील समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून त्यांना न्याय मिळे पर्यंत झटणाऱ्या नेत्याची २३ वर्षापूर्वी निर्घृण हत्या झाली. या हत्येच्या मुळापर्यंत जाऊन, तपास कार्यात भाग घेऊन प्रसंगी पोलीस पथकासोबत गुन्हेगारांना पकडण्यासाठी स्वतःच्या जीवावर उदार होऊन स्व.ओमप्रकाश मिश्र यांची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना पकडून देण्यात ज्यांनी मोलाची कामगिरी बजावली, असे ओमप्रकाश मिश्र यांचे निकटवर्ती व निस्सीम प्रेम करणारे भाजपाचे कार्यकर्ते इतकेच नव्हे तर ओमप्रकाश मिश्र यांच्या पावलावर पाऊल ठेऊन त्यांचा समाजसेवेचा वसा/वारसा घेऊन पुढे वाटचाल करीत असलेले प्रशांत पुजारी यांनी ओमप्रकाश मिश्र यांच्या निधनानंतर “ओमप्रकाश प्रतिष्ठान” या संस्थेमार्फत सातत्याने बोरीवली येथे समाजकार्य सुरु ठेवले आहे. गेली २३ वर्षे ओमप्रकाश मिश्र यांच्या पुण्यतिथीला रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, अपंगांना काठी, व्हील चेअर, चश्मा शिबीर, जनधन योजना अशा विविध समाजोपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून गरीब जनतेला मदतीचा हात देण्यासाठी कार्यमग्न आहेत. आजही स्व.ओमप्रकाश मिश्र यांच्या २३ व्या पुण्यतिथीदिनी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्याच संकल्पनेतून संपूर्ण उत्तर मुंबईत ५००० रक्त बाटल्या/पिशव्या संकलित करण्याच्या उपक्रमा अंतर्गत “महारक्तदान शिबिराचे” आयोजन केले होते. या शिबिरात सुमारे २०० हून अधिक बाटल्या/पिशव्या रक्त जमा करण्यात आले. या उपक्रमाबद्दल व करीत असलेल्या अन्य सामाजिक कार्याबद्दल खासदार गोपाळ शेट्टी यांनी प्रशांत पुजारी यांचा विशेष सन्मान केला. देशातील गोरगरीब जनतेला असाध्य रोग निवारणासाठी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेता यावेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘आयुष्मान भारत’ ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे ओमप्रकाश प्रतिष्ठानच्या माध्यमातून बोरीवली पूर्व येथील सुमारे १८० गरीब लोकांना ‘आयुष्मान भारत’ कार्डाचेही मोफत वितरण खासदार शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. तळागाळातील गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचून त्यांना सेवा द्या, असे आवाहन गोपाळ शेट्टी यांनी उपस्थित समस्त भाजपा व ओमप्रकाश प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना केले व तीच ओमप्रकाश मिश्र यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. ओमप्रकाश मिश्र यांच्या गत आठवणींना उजाळा देत कार्यक्रमाची सांगता झाली. या प्रसंगी आमदार सुनील राणे, नगरसेवक विद्यार्थी सिंह तसेच भारतीय जनता पक्ष व ओमप्रकाश प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!