‘मिशन धारावी’ या मोफत कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत अवघ्या 23 दिवसात 27 हजार नागरिकांचे लसीकरण
मुंबई प्रतिनिधी, ता.26 मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सूचनेनुसार व मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार राहुल शेवाळे आणि महापालिका जी उत्तर विभाग सहायक आयुक्त किरण दिघावकर, डॉ. विरेंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महानगरपालिका जी उत्तर विभाग, सिटी बँक आणि जसलोक रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन धारावी’ या मोफत कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत डॉ. श्रद्धा कांबळे, डॉ. आशुतोष गुप्ता, यांच्या अथक प्रयत्नाने अवघ्या 23 दिवसात 27 हजार नागरिकांचे महापालिका संक्रमण शिबीर धारावी येथे लसीकरण करण्यात आले असून दररोज तब्बल 1 हजार ते 1 हजार 500 नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. तर मुंबई सुवर्णकार संघ आणि शिवसेना उपशाखा प्रमुख संतोष देवरुखकर यांच्या पुढाकाराने सुवर्णकार व त्यांच्या कुटुंबातील 900 सदस्यांचे आजवर लसीकरण करण्यात आले आहे. या महिमेत शेड, स्नेहा, मॅजिक बस, रिअँलिटी कोर्स, बिजेएस, वर्ल्ड व्हिजन या संस्थानचे विशेष सहकार्य लाभले आहे. – -मुकेश धावडे
