मुंबई जनसत्ताच्या बातमीचा इफेक्ट -मासे विक्रीसाठी कोळी बांधवाणा मुंबई बाहेर जावे लागणार नाही -इथेच त्यांना जागा मिळेल ;आदित्य ठाकरेंचा दिलासा
मुंबई -कोळी बांधव हा खर्या अर्थाने मुंबईचा मालक आहे. त्याच्यामुळेच मुंबईची आर्थिक सामाजिक आणि संस्कृतिक प्रगती झाली असे असताना मुंबईतील मासे विक्रेत्याना मुंबईच्या मंडई मधून हद्दपार करण्याचा काही बिल्डर, धांदेवाईकाचा डाव आहे. त्याविरुद्ध कोळी बांधवांनी मोर्चा कडून आवाज उठवला. कोळी बांधवांचा हा आवाज मुंबईकर जनतेपर्यंत तसेच सरकार दरबारी पोहचवण्याचे काम मुंबई जनसत्ता न्यूज पोर्टल्ंने केले .त्यामुळे आता कोळी बांधवणा न्याय मिळाला असून मुंबई पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी संगितले की मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज मंडई मध्ये किरकोळ मासे विक्रेत्या महिलांसाठी येत्या १० दिवसात शेड बांधली जाईल तर घाउक मासे विक्ररेत्यसाठी कोंक्रीटन केले जाईल .अशा तर्हेने त्यांना एरोली मार्केट यावे जावे लागणार नाही तर त्यांचे त्यांच्या मूळ जागेतच पुनर्वसन होईल मंगळवारी याबाबत मुंबईचे माजी महापौर मिलिंद वैद यांच्या नेतृत्वाखाली कोळी बांधवांच्या एका शिष्टमंडळने आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती.