ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबईराजकीय

मुख्यमंत्र्यांचा राणेंना इशारा–जुने व्हायरस पुन्हा येत आहेत त्यांचा बंदोबस्त करावा लागेल .

मुंबई /मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लागण्याची भाषा करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करून तसेच शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून राणेंना चांगलाच दणका दिला होता.मात्र शिवसेना आणि भाजपच्या राडेबाजी मध्ये मुख्यमंत्री गप्प होते पण काल एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी राणेंचे नाव न घेता त्यांना इशारा दिलाय की जुने व्हायरस पुन्हा आले आहेत आणि त्यांचा साईड इफेक्ट सुधा जाणवू लागलाय त्यामुळे त्यांचा बंदोबस्त आता करावाच लागेल .अशा आक्रमक भाषेत राणेंना इशारा दिलाय
सध्या केंद्रीय मंत्री नारायण राणे हे जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या दोन्यावर आहेत . पण मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची भाषा करताच संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक त्यांच्या विरुद्ध पेटून उठला आणि महाराष्ट्रात शिवसेना विरुद्ध भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडेबाजी सुरू झाली यावेळी राणेंचा बंगला आणि मॉल याची तोडफोड करण्यात आली तसेच राणे यांच्या विरुद्ध नाशिक व इतर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्याने त्यांना संगमेश्वर मध्ये अटक झाली पण रात्री उशिरा मुरुड च्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांना जामीन मंजूर केला या सर्व घडामोडीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मेंटर गप्प होते त्यांची कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आली नव्हती त्यामुळे ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते .अखेर काल त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात राणेंचे नाव न घेता म्हणाले की करोना अत्मन अजून गेलेला नाही उलट आता काही जुने व्हायरस पुन्हा आले आहेत आणि त्याचा साईड इफेक्ट सुधा जाणवायला लागला आहे .. त्यामुळे आपल्याला त्याचा बंदोबस्त करावा लागेल असा इशाराच राणेंना दिला तसेच ते पुढे म्हणाले की करेनामुळे राज्याचे खूप नुकसान झाले आहे त्यामुळे आता उद्योग धंदे हळू हळू सुरू करावेच लागतील सर्व काही सुरू होईल पण खबरदारी घेऊन टप्प्या टप्प्याने सुरू केले जाईल असे ते म्हणाले
रणे व शिवसेना यांच्यातली राडेबाजी थांबणे कठीण आहे भाजपने शिवसेनेच्या काही भानगडी उघड करण्याचा इशारा दिल्यानंतर शिवसेना सुधा राणे यांच्या जुन्या फायली ओपन करण्याच्या तयारीत असल्याचे समजते त्यामुळे वाड आणखी वाढणार आहे

बॉक्स/जमावबंदी आदेश मोडून राणे आज सिंधुदुर्गात जन आशीर्वाद यात्रा काढणार

l

करोना च्या संकटकाळात सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी असतानाही राणे यांनी जन आशीर्वाद यात्रा काडली त्यामुळे आयोजकांवर ४२गुन्हे दाखल करण्यात आलेत तसेच सेना भाजपच्या राडेबाजीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात जमावबंदी आदेश जारी करण्यात आलंय मात्र हा आदेश झुगारून राणे सिंधुदुर्ग जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत त्यामुळे तणावाचे वातावरण असून काल कणकवलीत राज्य राखीव दलाचे ध्वज संचलन केले .

error: Content is protected !!