सवंग लोकप्रियतेसाठी शिंदे सरकारची आणखी एक घोषणा पोलिसांना 15 लाखात घर
मुंबई/ सरकारवर 5 लाख कोटींचे कर्ज आहे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार द्यायला सरकारकडे पैसा नाही मात्र तरीही मोठमोठ्या खर्चिक घोषणा करून सवंग लोकप्रियता मिळवण्याचा नव्या सरकारने प्रयत्न चालवला आहे . त्याचाच एक भाग म्हणू पोलिसांना अवघ्या 15 लाख रुपयांत 500 स्कवेर फुटाचे घर देण्याची घोषणा काल सरकारने केली आहे .
मुंबईतील वरळी,नायगाव आणि नाम जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्याची महत्वकांक्षी योजना मागील आघाडी सरकारने हाती घेतली होती या योजने अंतर्गत बीडीडी चाळीतील रहिवाश्यांना 50 लाखात 500 चो.फुटाचे घर दिले जाणार होते .पण शिंदे सरकार सतेवर येताच त्यांनी घराची किंमत 25 लाख केली बी डी डी चाळीत मोठ्या प्रमाणावर पोलीस कुटुंब राहतात मात्र त्यांच्या घरांची दुरवस्था झाली आहे . स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेचे अहोरात्र रक्षण करणाऱ्या या पोलिसांना सरकारने 15 लाखात घर देण्याचा निर्णय घेतला आहे .काल मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेत तशी घोषणा केली शॉर्ट टर्म मिड टर्म आणि लाँग टर्म अशा तीन टर्म मध्ये ही योजना पूर्ण केली जाणार आहे . त्यासाठी महापालिका सिडको एम एम आरडी आणि म्हाडा याना एकत्र बोलावून एक गृहनिर्माण धोरण आखले जाणार आहे . सरकारची ही योजना खूपच खर्चिक आहे वास्तविक घराची कन्स्ट्रक्शन कॉस्ट 1कोटी 5 लाख असताना पोलिसांना 15 लाखात घर देणे कर्जबाजारी सम्कारला कसे परवडणार असा सवाल केला जात आहे .