ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

पायरी सोडणाऱ्यांचा नाद सोडा

सध्या भारतीय राजकारणात सज्जन आणि नीतिमत्ता जपणारे लोक दुर्मिळ झालेत त्यामुळे लोकशाहीचे काही खरे नाही पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांचे पायऱ्या वरचे जे घाणेरडे राजकारण बघायला मिळतेय ते संतापजनक आहे त्यामुळे अशा लोकांना आमचे लोकप्रतिनिधी म्हणायची सुधा आता लाज वाटायला लागली आहे. महाराष्ट्र सारख्या प्रतिभाशाली राज्यात असे लोकप्रतिनिधी निर्माण व्हवेत हे खरोखरच महाराष्ट्रातल्या साडे बारा कोटी जनतेचे दुर्दैव म्हणावे लागेल, अशा लोकांच्या लोकशाही शासन व्यवस्थे पेक्षा हुकुमशाही परवडेल .कारण ज्यांनी विधानभवनाच्या पायरीवर बसून लोकशाहीचे श्राद्ध घातले . त्यांना आम्ही लोक प्रतिनिधी का म्हणायचे.निदर्शने आंदोलने या सगळ्या गोष्टी लोकशाहीचा एक भाग आहे पण लोकशाहीच्या मंदिराच्या पायऱ्यांवर बसून कुत्र्या मांजराचे आवाज काढणे . खोके ok सारख्या फालतू घोषणा देणे आणि नंतर हाणामारी करणे हा सगळा निंदनीय प्रकार आहे .त्यामुळे लोकांनी अशा राजकारण्यांच्या मागे फरफटत जाऊ नये त्यांनी त्यांची पायरी सोडली असेल तर निवडणुकीत त्यांना त्याची शिक्षा द्यायला हवी .पण पायऱ्या वरच्या गलिच्छ राजकारणाचा प्रत्येकाने निषेध करायला हवा . यंदाचे पावसाळी अधिवेशन जेमतेम आठवडाभर आहे या अधिवेशनात लोकांच्या प्रश्नांवर चर्चा होणे अपेक्षित होते . पण सभागृह सुरू होण्यापूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी करून वातावरण तपावणे आणि त्यानंतर पुन्हा सभागृहात त्याची चर्चा करणे हे चुकीचे आहे .पण आजकालच्या लोकप्रतिनिधींना हे कोण सांगणार ? महाराष्ट्राच्या विधिमंडळाला स्व.यशवंतराव चव्हाण,वसंतराव नाईक वसंतदादा पाटील गणपतराव देशमुख यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्यांचा वारसा आहे .त्यांचे सभागृहातील आणि सभागृहाच्या बाहेरील वर्तन राजकीय क्षेत्रात करियर करू पाहणाऱ्या प्रत्येक माणसासाठी आदर्श ठरणारे होते . म्हणूनच त्यांची समाजात विश्वसनीयता होती .आजच्या लोकप्रतिनिधींनी विधानभवनाच्या पायऱ्याना गावातली चावडी बनवली आहे. चावडीवर चे लोक तरी चांगले असतात.चावडीवर बसून गावाच्या भल्याची चर्चा करीत असतात एकमेकांशी प्रेमाने वागतात पण विधानभवनाच्या पायऱ्या वर बसून कुत्र्या मांजराचे आवाज काढणारे ओके आणि खोके यातच आपली एनर्जी खर्च करणारे लोक हे गावातल्या चावडी वरच्या लोकांपेक्षा ही वाईट आणि बेजबाबदार आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही

आजचे राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधी हा लोकशाहीसाठी केवळ औपचारिक पर्याय ठरला आहे लोकांसमोर दुसरा कोणताही मार्ग नसल्याने लोक नाईलाजाने निवडणूक प्रक्रियेत भाग घेतात आणि कोणाला तरी निवडून द्यायचं म्हणून देतात मात्र निवडून दिलेल्या लोक प्रतिनिधींकडून लोकांना फारशी अपेक्षा नसते.आणि हीच या देशातील लोकांची आणि लोकशाहीची मोठी शोकांतिका आहे . कारण चांगले सज्जन लोक जरी निवडणूकी ला उभे राहीले तरी ते निवडून येऊ शकतं नाहीत कारण त्यांच्याकडे नितीमता चांगले विचार असेल तरी पैसा नसतो आणि व्यक्ती पूजा करण्याची पक्षातील वरिष्ठांची हुजरेगिरी करण्याची त्यांची मानसिकता नसते .त्यामुळे असे लोक कधीच निवडून येऊ शकतं नाहीत.आणि म्हणूनच पायरीवरचा घाणेरड्या राजकरणाचा लोकांनी विचार करू नये.आणि अशा लोकांच्या मागे फरफटत जाऊन लोकांनी आपली पायरी सोडू नये.कारण जे एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करीत आहेत अशी अधिवेशन काळात असल्या फालतू गोष्टी करून लोकांना आपली पायरी दाखवून देत आहेत ते सगळे एकाच डबक्यातले आहे आणि प्रत्येकानी कमी अधिक प्रमाणात भ्रष्टाचाराच्या गटार गंगेत डुबक्या मारलेल्या आहेत.त्यामुळे त्यांनी भ्रष्टाचार च्या मुद्द्यावरून एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करणे म्हणजे एक प्रकारे बिन पैशाचा तमाशाच म्हणावे लागेल लोकांनी त्याच्याकडे केवळ मनोरंजनाच्या दृष्टीतून बघावे अशा लोकांना गांभीर्याने घेऊ नये .

error: Content is protected !!