१० वर्षाच्या अपंग मुलाकडून मुंबईतील विमानात बॉम्ब ठवल्याची अफवा
मुंबई – १० दिवसात लागोपाठ दुसऱ्यांदा मुंबईत बॉम्बच्या अफवेमुले पोलिसांची मोठी तारांबळ उडाली . मात्र आज ज्यांनी बॉम्ब ठेवल्याचा फोन केला होता तो चक्क १० वर्षाचा अपंग मुलगा निघाला . आणि त्याने चुकून पोलिसांना तास फोन केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले
नवी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला गुरुवारी धमकीचा फोन कॉल आला होता. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने विमानतळावरील विमानात बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. तसेच, विमान 10 तासांनी टेक ऑफ करणार असून मदतीची आवश्यकता असल्याचे कॉल करणाऱ्याने सांगितले.
या माहितीनंतर नवी मुंबई पोलिसांकडून तात्काळ मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती देण्यात आली. त्यासोबतच दहशतवाद विरोधी यंत्रणा, स्थानिक सहार पोलीस, बॉम्ब शोधक पथकाला सतर्क करण्यात आले.
सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण विमानतळाची सुरक्षा यंत्रणांकडून पाहणी करण्यात आली. त्यासोबतच पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकही घेण्यात आली होती. पोलिसांनी दूरध्वनी आलेल्या क्रमांकाला ट्रेस करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
धमकीचा फोन सातारा जिल्ह्यातील एका रहिवाश्याचा असल्याचे उघड झाले. पोलिसांनी रहिवाशाची चौकशी केली असता त्यांच्या 10 वर्षांच्या अपंग मुलाने चुकून दूरध्वनी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर सर्व यंत्रणांना याबाबतची माहिती देण्यात आली.