ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मोदींनी जळगावमध्ये फुंकले विधानसभा निवडणुकीचे रणशिंग


जळगाव- महाराष्ट्रात आता खऱ्या अर्थाने विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान मोदींनी लखपती दीदी संम्मेलनात विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले यावेळी मुख्यमंत्री शिंदे व उप मुख्यमंत्री फडणवीस व अजितदादाही उपस्थित होते
राज्यातील विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे. तसतसे महाराष्ट्रातील राजकीय वातावरणदेखील तापण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने १६ ऑगस्टला जम्मू-काश्मीर व हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणुका जाहीर केल्या.
महाराष्ट्र निवडणूक कधी जाहीर होणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरित असला तरी जळगावमध्ये लखपती दीदी संमेलनाच्यानिमित्त आलेल्या पीएम मोदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच विविध घोषणा करीत विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
लोकसभा निवडणुकीत पिछाडीवर पडल्याने भाजपसह महायुतीतील सर्वच पक्ष आता दक्ष झाले आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सत्ताधारी महायुतीने लाडक्या योजनांचा आधार घेतला आहे. तर विरोधकही सरकारला योजनांसह अनेक मुद्द्यावरून घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. याच वेळी जळगावमधून पीएम मोदी यांनी मोठ्या घोषणा करीत राज्य सरकार करीत असलेल्या कामांचे कौतुक केले. त्यासोबतच येत्या काळात राज्य सरकारच्या विविध योजनासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्याची घोषणा केली.
एका तराजूत अन्य सरकारचे सात दशक आणि दुसऱ्या बाजूला मोदी सरकारची दहा वर्षे ठेवली जावीत. मोदी सरकारने जेवढं काम माता भगिनींसाठी केले ते कोणत्याच सरकारने केले नाही. जी घरे सरकारकडून बनवली गेली. ती सर्व घरे माता भगिनींच्या नावावर आहेत. बचतगटांशी जोडल्या गेलेल्या महाराष्ट्रातील लाखो माता भगिनींना कोट्यवधी रुपयांची मदत मिळाली. या पैशातून आम्हाला अनेक महिलांना लखपती दीदी बनवण्यासाठी फायदा होणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी केले आहे.

error: Content is protected !!