ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मालवणमध्ये शिवरायांचा ३५ फूट उंच पुतळा कोसळला – शिवभक्तांमध्ये संतापाची लाट कारवाईची मागणी

.
मालवण – काही महिन्यांपूर्वी नौदल दिनी पंतप्रधान मोदींच्या हस्ते मालवणच्या राजकोट किल्ल्याजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फूट उंच पुतळा कोसळला . या घटनेमुळे महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींना मध्ये संतापाची लाट उसळली आहे. हा पुतळा नेव्हीने उभारला होता असे सांगून महाराष्ट्र सरकारने यातून आपले हात झटकले आहेत. दरम्यान हा पुतळा तात्काळ उभारण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले
झालेली घटना ही दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. हा पुतळा नौदलाने उभारला होता. त्याचं कम्पलिट डिझाईन नेवीने तयार केलं होतं. मी कलेक्टरशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की, ताशी ४५ किमी वेगाचा वारा होता. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पुतळ्याचं नुकसान झालं आहे. उद्या तिथे नेवीचे अधिकारी येणार आहेत. आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण घटनास्थळी गेले आहेत. मी त्यांना सूचना केलेल्या आहेत. उद्या तात्काळ नेवीचे अधिकारी आणि आमचे अधिकारी हे छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्याचं पुन्हा काम करतील”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
आमदार वैभव नाईक यांनी या घटनेनंतर मालवणमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली. याबाबत एकनाथ शिंदे यांनी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “ठीक आहे. शेवटी भावना आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत आहेत. पण कायदा हातात घ्यायची आवश्यकता नाही. कायदा-सुव्यवस्था राखण्याचं काम प्रत्येकाने केलं पाहिजे. कायदा हातात घेण्याचा कुणालाही अधिकार नाही. राज्यात शांतता आणि सुव्यवस्था राहिली पाहीजे यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली

error: Content is protected !!