ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

पीएफआय ( PFi ) चा खातमा निश्चित — भवानजी

मुंबई: वरिष्ठ भाजपा नेता आणि मुंबई चे मा उपमहापौर बाबूभाई भवानजी यांनी सांगितले की वारंवार देशविरोधी कृत्ये करणाऱ्या पीएफआई चे विरुद्ध सरकार ने केलेली कारवाई अभिनंदनीय आहे. त्यामुळे आता पीएफआई चा खातमा निश्चित आहे.

आज श्री भवानजी यांनी सांगितले की एनआईए , ईडी आणि 14 राज्यांच्या पोलीस टीम ने काल एकाच वेळी देशभर 50 ठिकाणी छापेमारी केली.

त्यांनी पुढे सांगितले कि 100 हून ज्यादा मोठे पदाधिकारी अटकेत गेले आहेत. सर्वांना दिल्लीला पाठविण्यात येणार आहे , छापेमारी नंतर हैदराबाद व शाहीन बाग येथील पीएफआई चे हेडक्वार्टर सील करण्यात आले आहेत.

त्यांनी पुढे सांगितले कि या प्रकरणात एनआईए कार्यवाही करत असल्याने १००% यश मिळेल.या कारवाई मुळे आता पीएफआई च्या कारवाया निश्चित बंद होतील.

त्यांनी सांगितले कि अशा प्रकारची सार्वत्रिक कारवाई करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, अनेक महिने दिवस रात्र जागावे लागते, आर्थिक व्यवहार तपासावे लागतात त्यानंतर पुरावे हाती लागतात.

त्यांनी पुढे सांगितले की जेव्हा सर्व कायदेशिर कारवाई पूर्ण होते तेव्हाच अचानक 14 राज्यांमध्ये शेकडो टीम चे हजारो कर्मचारी मिळून धाडी टाकतात.

भवानजी यांनी शेवटी सांगितले की सरकारवर टीका करणे सोपे असते, अनेक आरोप रचले जातात, तेव्हा सरकारी अधिकारी पुरावे गोळा करीत असतात.

error: Content is protected !!