ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्रराजकीय

जनगणना ही जात निहाय झाली पाहिजे तरच आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टामध्ये टिकेल

मुंबई -येत्या 26 तारखेला आरक्षण बाबत सुप्रीम कोर्टामध्ये निकाल आहे . महाराष्ट्र सरकारच्या वतीने योग्य बाजू मांडली न गेल्यास या सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करू व महाराष्ट्रातील खासदार व आमदार यांना तृतीयपंथ याद्वारे बांगड्यांचा आहेर त्यांच्या घरी जाऊन देवू व त्यांच्या घरासमोर आंदोलन करू असा निर्णय मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित महाचिंतन बैठक मध्ये घेण्यात आला

विमुक्त भटके जन आंदोलन कृती समिती विमुक्त जाती भटक्या जमातीचे प्रतिनिधी व विविध संघटना पदाधिकारी यांची महाचिंतन बैठक मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित करण्यात आली. या महाचिंतन बैठक बंजारा सेवा संघ समितीचे समन्वयक राजपाल सिंग राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झाली . माजी खासदार हरिभाऊ राठोड उपस्थित होते, भारतीय भटके विमुक्त आदिवासी नेते अशोक धनगावकर ,ओबीसी नेते एडवोकेट राकेश राठोड, इंटेलिजंट फोरम चे नेते अंबरसिंग चव्हाण व ओबीसी नेते उपस्थित होते .
महाराष्ट्राचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुढाकार घेऊन आरक्षणा बाबत योग्य तो निर्णय घ्यावा व राज्य शासनाच्यावतीने योग्य तो पाठपुरावा करा असले आम्ही विनंती करीत आहोत आमचा मुख्य प्रश्न असा आहे की जनगणना ही जात निहाय झाली पाहिजे तरच आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टामध्ये टिकेल असे बैठकीत मत मांडले .

error: Content is protected !!