ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

पालिकेची हातसफाई आणि १८४४ कोटींच्या घोटाळ्यांची वसाहात


मुंबई/सत्ताधारी शिवसेना ,पालिका अधिकारी,आणि कंत्राटदार या त्रिकुटाने मिळून पालिकेची तिजोरी लुटून खाण्याचा एक कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे की काय असा संतप्त सवाल मुंबईकर जनता विचारीत आहे कारण पालिकेच्या जागेवर उभ्या राहिलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत तर कोट्यवधींचा घोटाळा झालेलाच आहे पण आता सफाई कामगारांच्या वसाहतीच्या पुनर्विकासाच्या कामात सुधा १८४४कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपने केला असून या घोटाळ्याची चौकशी झाल्याशिवाय मुंबई महापालिकेची निवडणूक घेऊ नका अशी मागणी मुंबईकरांनी केली आहेे.
मुंबई महापालिका वसाहतींचा आश्रय योजने अंतर्गत पुनर्विकास सुरू आहे मात्र त्यात ८४४कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपने केलाय.सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे न देता पुन्हा सेवा निवासात जर ठेवले जाणार असेल तर पालिका वसाहतींचा पुनर्विकास कोणासाठी? असा सवाल केला जात आहे सफाई कामगारांच्या पुनर्विकासात बांधकामाचा खर्च४८६० प्रती चो.फूट असून एस आर ए चा घरांसाठी हाच दर १५०० असतो मग इथेच ३३६० रुपये कसे वाढले या वसाहतींना सोन्याचे दरवाजे बसवले जाणार आहेत का असा संतप्त सवाल मुंबईकर विचारीत आहेत.सरकारचे ५० टक्के अनुदान आणि पालिकेचे ५० टक्के अनुदान यातून पालिका वसाहतींचा पुनर्विकास होऊ शकतो मग सगळं भर पालिकेच्या तिजोरीवर का यातून कोणाचे खिसे गरम होणार आहेत याचे उत्तर पालिकेने द्यावे ही संपूर्ण १८४४ कोटींची लूट असून या प्रकरणी मुख्यमंत्री व नगरविकास मंत्र्यांना पात्र पाठवूनही अजून दखल घेण्यात आलेली नाही.विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारच्या आर्थिक क्षमता नसलेल्या शयोना कॉर्पोरेशन कंपनीला१४०० कोटींचे कंत्राट कसे देण्यात आले यात सत्ताधारी पक्षातील लोकांचा आणि पालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांची किती टक्केवारी आहे याची चौकशी व्हायलाच हवी अशी मागणी मुंबईकर करीत आहेत

error: Content is protected !!