ई विभागातील बबली-बंटीने दारुखान्यात सुरू केली वसुली
मुंबई : (किसनराव जाधव) महानगर पालिकेच्या ई विभाग अंतर्गत येणार्या दारुखाना विभागातील अनधिकृत तसेच अधिकृत कारखान्यात मालक आणि व्यवस्थापक यांना भेटून दंडात्मक कारवाईची भीती दाखवित वसुली सुरु केल्याची धक्कादायक माहिती खास सूताकडून मिळाली आहे.लक्ष्यात ठेवण्याजोगी बाब म्हणजे दारुखान्यात अनेक कारखान्यात नियम बाह्य काम होत असून त्याची माहिती घेऊन हि वसूली सुरु असल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे आपल्याला होणार्या त्रासाची आर्थिक पिळवणुकीची तक्रार पोलिसांत आणि पालिका आयुक्तांकडे देण्यास व्यवसायिक भीत आहेत. या बबलीची खात्यातून बदली होऊनही दहशत मोठया प्रमाणात कायम आहे.अनेक अभिंयते तिच्या जागेवर काम करण्याचे टाळतात.
विशेष बाब म्हणजे या बबली सोबंत बंटी पाटणर मिळाल्याने बिनधास्त वसूली चालू आहे. या बबलीला रोखणार कोण? असा सवाल व्यवसायिक करत आहे. याबाबत सहायक आयुक्त मनिष वळुंज यांची भेट घेतली असता त्यानी जनतेला असे आवाहाण केले की व्यवसायिक यांनी न भीता पालिकाकडे तक्रार करावी.