ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामुंबई

गुजरातच्या किनाऱ्यावर ३०० किलो ड्र्ग आणि शस्त्रांसह १० पाकिस्तान्यांना अटक


ओखा – गुजरातच्या किनाऱ्यावरून भारतात घुसण्याचा पाकिस्तानी अतिरेक्यांचा प्रयत्न फसला आहे. कोस्ट गार्ड आणि गुजरात एटीएस यांच्या संयुक्त मोहिमेत एक पाकिस्तानी बोट गुजरातच्या ओखा किनाऱ्यावर पकडण्यात आली असून त्यातून शस्त्रास्त्रे ,दारुगोळा आणि ३०० किलो अमली पदार्थांसह १० पाकिस्तानी अतिरेक्यांना अटक करण्यात आली

गुजरातमध्ये पाकिस्तानी बोटीतून दारु गोळा, हत्यारांसह 300 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. इंडियन कोस्ट गार्ड (तटरक्षक दल) आणि गुजरात पोलिसांनी संयुक्तरित्या आज कारवाई केली.

गुजरातमध्ये इंडियन कोस्ट गार्ड आणि गुजरात पोलिसांनी एटीएसकडून मिळालेल्या माहितीची आधारावर पाकिस्तानी बोट ताब्यात घेतली. या बोटीमध्ये 10 पाकिस्तानी नागरिक होते. बोटीच्या कॅप्टनसह दहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्याशिवाय आयसीजीने या बोटीमधू दारु गोळा, हत्यारांसह किलो ड्रग्ज जप्त केलेय. या ड्रग्जची किंमत तब्बल 30 कोटी रुपये आहे. आयसीजीने सांगितलं की, गुजरात पोलीस आणि कोस्ट गार्ड जवानांनी ही कारवाई २५ आणि २६ डिसेंबर रोजी केली.

आयसीजीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, गुजरात एटीएसकडून पाकिस्तानमधून एक बोट भारतात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर २५आणि २६ डिसेंबर रोजी कोस्ट गार्ड आणि गुजरात पोलिसांनी संयुक्तरित्या एक ऑपरेशन चालवलं. अरिंजय बोटीला पाकिस्तानला लागून असलेल्या भारतीय समुद्रात तैणात करण्यात आलं होतं. त्यानंतर मासेमारी करणाऱ्या सहेली नावाच्या पाकिस्तानी बोटीला ताब्यात घेतलं. त्या बोटीचा तपास केला असता त्यामुळे दारु गोळा, हत्यारे आणि 40 किलो ड्रग्ज आढळले. पाकिस्तानी बोटीसह सर्व सामान जप्त करण्यात आलेय. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत 300 कोटी रुपये आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सध्या सुरु आहे.

error: Content is protected !!