ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

बीड मधील संतोष देशमुख हत्याकांड – मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला २ दिवसांचा अल्टिमेटम

बीड – मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी बीडच्या मस्साजोग हत्याकांडातील पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या प्रकरणातील मास्टरमाईंडला अटक करण्यासाठी सरकारला 2 दिवसांचा अल्टीमेटम देत बीडमधील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच पोलिस अधिकाऱ्यांची महिन्याभरात बदली करण्याची मागणी केली. राज्य सरकारकडून या प्रकरणी त्वरीत कारवाईची अपेक्षा असल्याचे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची गत 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटलेत. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मीक कराड यांचे नाव आल्यामुळे प्रकरणाची संवेदनशीलता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सरकारला उपरोक्त अल्टीमेटम दिला आह
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली आहे. या प्रकरणी न्यायाच्या लढाईत त्यांचे कुटुंबीय एकटे नाही. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील मराठा समाज देशमुख कुटुंबीयांच्या पाठिशी आहे. या हत्याकांडातील मास्टरमाईंडला सरकारने 2 दिवसांत अटक करावी. वाल्मीक कराड हा सरकारपेक्षा मोठा झाला आहे का? असा संतप्त सवाल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबा पाटील यांनी यावेळी केल
बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीला लगाम घालायचा असेल तर एकट्या पोलीस अधीक्षकांची बदली करून काहीही होणार नाही. हे एक मोठे जाळे आहे. ते उद्धवस्त करण्यासाठी महिन्याच्या आत बीडच्या पोलिस दलातील संपूर्ण अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची गरज आहे. सरकारने सदर प्रकरणातील आरोपींना 2 दिवसांत अटक करावी. महाराष्ट्र शांत ठेवायचा असेल, बीड जिल्हा शांत ठेवायचा असेल, तर सरकारला आमचा 2 दिवसांचा अल्टीमेटम आहे, असे क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

error: Content is protected !!