लँडिंग करताना विमानाला आग ४२ प्रवाशांचा मृत्यू
मॉस्को – कझाकिस्तानमध्ये रशियाला जाणाऱ्या विमानाचा भीषण अपघात झाला. पक्ष्यांच्या थव्याने विमानाला धडक दिल्याने तांत्रिक बिघाड झाला आणि इमर्जन्सी लँडिंग करताना विमान कोसळले. यात ४२ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर २५ जण जखमी झाले. या विमान अपघाताचे थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
कझाकिस्तान देशातून रशियाच्या दिशेला जाणाऱ्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर विमानात लागलेल्या भीषण आगीमुळे तब्बल 42 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त विमान हे कझाकिस्तानच्या अझरबैजानमधूल बाकू येथून रशियाच्या चेचन्याची राजधानी असलेल्या ग्रोझनी येथे जात होते. या दरम्यान हवेत पक्षांचा थवा विमानाला थडकला. यामुळे विमानात तांत्रित बिघाड झाला. या तांत्रिक बिघाडामुळे विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण इमर्जन्सी लँडिंग करत असताना विमान सारखं खालच्या आणि वरच्या दिशेला जात होते. अखेर लँडिंगवेळी विमान जमिनीला जोरात धडकलं आणि विमानाने जागच्या जागी घिरट्या घेतल्या. यामुळे विमानाचे सर्व भाग खिळखिळे झाले आणि मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे विमानाला भीषण आग लागली. या आगीत ४२ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या विमान अपघाताचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे अपघातग्रस्त विमान हे अझरबैजान एअरलाईन्सचे आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २५ जण बचावले आहेत. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेचे व्हिडीओ समोर आल्यानंतर संपूर्ण जग हादरलं आहे.