ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

राज्यात फेब्रुवारीत महापालिका निवडणुका ?

नागपूर – लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते महापालिका निवडणुकीकडे . कारण मुंबई महापालिकेश अनेक महापालिकांच्या निवणुका होणार आहेत . महापालिका निवणुकीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात ज्या याचिका प्रलंबित आहेत त्याची सुनावणी जानेवारीत पूर्ण होण्याचीशाक्य्ता वर्तवली जात आहे त्यानंतर फेब्रुवारीत महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या शतकीय जयंती वर्षानिमित्त नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विदर्भाती मंत्री आणि नवनिर्वाचित भाजप आमदारांचा जाहीर सत्कार केला जात आहे. त्यासाठी, मुख्यमंत्री नागपुरात असून त्यांनी पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही त्यांनी भाष्य केलं. ”मला असं वाटतं की, जानेवारीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भाने अंतिम सुनावणी ठेवलेली आहे. आम्ही देखील याबाबत सातत्याने विनंती केली आहे, मला अशी अपेक्षा आहे की, जानेवारी महिन्यातच सर्वोच्च न्यायालय याप्रकरणी अंतिम सुनावणी घेऊन निकाल देईल. त्यानंतर, जो काही वेळ असेल तो घेऊन निवडणुकांच्या तारखा जाहीर होती, अर्थात निवडणुकांच्या तारखा ठरवायचा अधिकार हा आमचा नसून सर्वोच्च न्यायालयाचा आहे,” असेही मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं. आम्ही देखील सरकार म्हणून या प्रकरणी जास्तीत जास्त प्रयत्नशील असून लवकरात लवकर निवडणुका व्हाव्यात हे पाहत आहोत, असेही फडणवीसांनी सांगितले.

error: Content is protected !!