निवडणूक आयोगावरचा आमचा विश्वास उडाला – उद्धव ठाकरे
मुंबई -मराठी भाषादिनाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी भाजप शिंदे गट आणि निवडणूक आयोगावर घणाघाती टीका करताना निवडणूक आयोगावरचा आमचा विश्वास उडाला आहे असे सांगितले
ठाकरे म्हणाले की, पक्षासंबंधी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना निवडणूक आयोगाने या गोष्टी करायला नको होत्या. रामविलास पासवान यांच्या मुलाला एक आणि त्याच्या काकाला एक चिन्ह दिली, पण ते दोघेही भाजपसोबत असल्याने त्यांचा पक्ष आहे. आता केंद्र सरकारला वाटेल तसा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेतला जातोय.
बाकी सगळं चोरता येतं पण आई-वडिलांनी केलेलं संस्कार चोरता येत नाही, ज्यांच्यावर संस्कार नसतात त्यांना चोरीचा माल लागतो अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केली. तुम्ही नाव चोरलत, धनुष्यबाण चोरलात पण तुम्ही ठाकरे हे नाव कसं चोरणार, हे ठाकरे सगळं शिवसेना कुटुंब आहे असंही ते म्हणाले. आपले आई वडील अडगळीत टाकून दुसऱ्यांचे बाप चोरता, लोक चोराल, विचार चोरता येणार नाहीत असं उद्धव ठाकरे म्हणाले.