मनोज जरांगेसह ४२५ मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल – आंदोलन दोन दिवसांसाठी थांबवले- जरांगे बेक्फूटवर
जालना – मराठा आरक्षणासाठी गेल्या १७ दिवसांपासून दुसर्यांदा आमरण उपोषण करणारे जरांगे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे सरकार एक्शन मोडवर आले आहे . बीड मध्ये पोलिसांचा आदेश झुगारून रस्ता रोको केल्या प्रकरणी जरांगेंसह त्यांच्या ४२५ कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तर आज संपूर्ण महाराष्ट्रात जरांगे यांच्या विरोधात
भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले . मात्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. तसेच आपण सर्व मराठ्यांच्या बाजूने आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करा असा सल्ळी दिला आहे . तर वातावरण तापलेले पाहून जरांगे यांनी तूर्तास मुंबईला जाण्याचा निर्णय रद्द केला . तसेच उपोशंन मागे घेतले . आता २ दिवसांनी पुढील आंदोलनाची रूपरेष ठरवली
जाणार आहे. मात्र सगे सोयऱ्यांच्या मुद्द्यावर आपण ठाम असल्याचे त्यांनी सांगितले
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी गेल्या १७ दिवसापासून उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण मागे घेतले आहे. तसेच उद्यापासून धरणे आणि साखळी उपोषण करण्याचे आवाहन मराठा बांधवांना केले आहे. मात्र बीडमध्ये परवानगी नाकारल्यानंतरही रास्ता रोको केल्याप्रकरणी त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कारवाई करत जरांगे यांच्यासह ४२५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मनोज जरांगे यांच्याविरोधात शिरूर आणि अंमळनेर या दोन पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल झाला आहे.