धर्म निरपेक्षतेची प्रतीक्षा कधी संपणार?
काश्मिर पासून कन्याकुमारी आणि गुजरातपासून अरुणाचल प्रदेश पर्यंत पसरलेल्या या प्रचंड अशा मोठ्या खंडप्राय भारत देशात सर्व जातीधर्माचे लोक ज्या दिवशी गुण्या गोविंदाने राहतील.ज्या दिवशी इथल्या अल्पसंख्याक समुदायाच्या मनातून असुरक्षिततेची भावना निघून जाईल त्या दिवशी हा देश खऱ्या अर्थाने धर्म निरपेक्ष म्हणून ओळखला जाईल आणि शांततेने जीवन जगणाऱ्या या देशातील प्रत्येक माणसाला याच दिवसाची अपेक्षा आहे.मी हिंदू किंवा मुसलमान आहे यापेक्षा मी एक भारतीय नागरिक आहे याचा अभिमान ज्या दिवशी प्रत्येकाच्या मनात कायमचा घर करून राहील त्या दिवशी या देशाची एक वेगळी ओळख निर्माण होईल आणि त्याच दिवसापासून या देशाची खऱ्या अर्थाने विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू होईल आणि त्याच दिवसाची या देशातील सच्चा राष्ट्रवादी नागरिकाला प्रतीक्षा आहे.राष्ट्रवाद हा कुठल्या एका धर्माशी निगडित असू शकत नाही. पण दुर्दैवाने या देशात भाजपची सत्ता आल्यापासून राष्ट्रवादाची परिभाशाच बदलून गेली आहे.कारण या देशाला हिंदुराष्ट्र बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि तसे झाले तर या देशाची आणखी एक फाळणी होण्याचा धोका आहे.आणि हाच धोका टाळण्यासाठी या देशातील प्रत्येक नागरिकांनी धर्मवाद,जातीयवाद यासारख्या फालतू गोष्टींना विरोध करायला हवा.कारण सध्याच्या विज्ञान युगात धर्माला,जातील कवडीचीही कुमार नाही.आज हिंदू मुलगी मुस्लिम किंवा दलीत तरुणाशी लग्न करतेय.तसेच हिंदू तरुण सुधा मुस्लिम किंवा दलीत मुलीला आपल्या आयुष्याची जीवनसाथी बनवतो आहे.त्यात कुठे आलाय जातधर्म? आणि जात धर्म देव यांच्या वाचून कुणाचं काहीही अडत नाही.जेंव्हा एखादा माणूस दुकानावर काही खरेदी करायला जातो तेंव्हा दुकानदार त्याला त्याची जात किंवा धर्म विचारात नाही तर तो माणूस जी वस्तू खरेदी करायला आला आहे ती घेण्या इतके त्याच्याकडे पैसे आहेत की नाही बस एवढंच त्या दुकानदाराला ठाऊक असत.तसेच हॉटेल मध्ये जेंव्हा एखादा माणूस जेवायला किंवा चहा प्यायला जातो तेंव्हा तो जेवत असलेल्या ताटात त्याच्या अगोदर कोण जेऊन गेलाय याची त्याला कल्पना नसते.मग अशा तऱ्हेने व्यवहारिक जीवनात जर जाती धर्माच्या वाचून कुणाचे काही अडत नसेल जात आणि धर्माचा आग्रह कशासाठी? भारताला हिंदू राष्ट्र banavlyane इथल्या हिंदूची आर्थिक भरभराट होणार आहे का? लोकांना कामधंदा मिळणार आहे का?लोकांच्या पोटापाण्याची औषध पाण्याची मोफत व्यवस्था होणार आहे का ? माणूस कुठल्याही धर्मात असला तरी त्याला पोटापाण्यासाठी काम धंदा करावाच लागणार नाही आणि समजा एखादा माणूस कुठल्याही धर्मात नसेल किंवा धर्माला मनात नसेल तर तो उपाशी मारणार आहे का ? असे काहीही होणार नाही माणूस कुठल्याही जाती धर्माचा असो त्याला जगण्यासाठी काम धंदा करावाच लागतो आणि कामधंदा केल्याशिवाय तो जगू शकत नाही. दुर्दैवाने हेच वास्तव इथल्या हिंदुत्ववाद्यांच्या पचनी पडत नाही .आणि सरकार सुधा अशा लोकांची बाजू घेत आहे.त्यामुळे या देशाच्या एकात्मता आणि अखंडतेला मोठा धोका निर्माण झाला आहे
आज कारण नसताना रस्त्यांची शहरांची नावे बदलली जात आहे.प्रत्येक धर्माची एक संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीच्या काही निषण्या इतिहासाची साक्ष म्हणून उभ्या आहेत.आणि धार्मिक स्वातंत्र्य अंतर्गत कायद्याने त्यांना संरक्षण सुधा आहे असे असताना इलाहाबाद शहराचे pryagraaj असे नामांतर करण्यात आले औरंगाबादचे संभाजी नगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्यात आले आहे त्यामुळे इथला अल्पसंख्यांक समाज दुखावला जातोय त्याच्या मनात परकेपणाची आणि असुरक्षेची भावना निर्माण होते उत्तर प्रदेशात खाटीक समाजाचा व्यवसाय बंद पाडण्यात आला ठीक आहे गोहत्या करण्यावर बंदी घाला पण मांसाहारी माणसांसाठी इतर प्राण्यांच्या मांस माच्छिला विरोध का करताय? कुणी काय खायला हवे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे? तुम्ही सांगणारे कोण? हे जर असेच सुरू राहिले तर मनुवाद पुन्हा समाजाच्या बोकांडी बसेल आणि तीनशे चारशे वर्षांपूर्वी जी भयानक जाती व्यवस्था अस्तित्वात होती ती पुन्हा येईल आणि पुन्हा दलितांना त्यांचे अधिकार नाकारले जातील पुन्हा समाजाची नाडी शेंडी daanvyala बांधली जाईल मुस्लिमांना या देशातून हल्लण्यात येईल आणि दलितांना गुलाम म्हणून जगण्याची पाळी येईल म्हणूनच या देशातील शांततेने आणि बंधुभवणे जगणाऱ्या प्रत्येक माणसाने जातीयवाद धर्मवाद या गोष्टींना विरोध करायला हवा धर्म निरपेक्ष भारतासाठी हे आवश्यक आहे!
: